कर्जतमधील ६ दुकाने सील नगरपंचायतची धडक कारवाई ; व्यवसायिक संतप्त

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जतमधील ६ दुकाने सील नगरपंचायतची धडक कारवाई ; व्यवसायिक संतप्त

कर्जत : प्रतिनिधी अनेक वर्षांपासून नगरपंचायतीचा कर थकीत असलेल्या दुकानदारांवर कर्जत नगरपंचायतीच्या वतीने शुक्रवारी दुकाने सीलची कारवाई करण्यात आली

कोरेगावचा लुटारू अखेर कर्जत पोलिसांकडून जेरबंद
माजी मंत्री राम शिंदेंना मोठा झटका… भाजपचा बडा नेता गेला राष्ट्रवादीत
तुकाराम पवार यांची अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध समितीवर निवड

कर्जत : प्रतिनिधी

अनेक वर्षांपासून नगरपंचायतीचा कर थकीत असलेल्या दुकानदारांवर कर्जत नगरपंचायतीच्या वतीने शुक्रवारी दुकाने सीलची कारवाई करण्यात आली. नगरपंचायतीच्या वतीने व्यवसायिकांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानुसार ६ दुकाने सील केली असल्याची माहिती मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिली.

कारवाई दरम्यान व्यवसायिक संतप्त झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय बंद होते. व्यवसायिक आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे नगरपंचायतीने दुकाने सीलची कारवाई थांबवावी, अशी मागणी व्यावसायिकांकडून करण्यात आली.

कारवाई दरम्यान गोंधळ वाढू लागल्याने मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी व्यवसायिकांना चर्चेसाठी नगरपंचायतमध्ये बोलावले. त्यानुसार व्यवसायिकांनी आपले विविध मुद्दे मांडले. त्याचा विचार करून ५० हजार रुपयापर्यंत थकबाकी असलेल्या व्यवसायिकांनी येत्या सोमवारपर्यंत (दि.११ ऑक्टोबर) ५० टक्के रक्कम भरावी.

उर्वरित रक्कम दिवाळीनंतर भरावी, असा निर्णय घेण्यात आला. ५० हजारांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या व्यवसायिकांना तीन टप्प्यात रक्कम भरण्याची सवलत देण्यात आली असल्याचे मुख्याधिकारी गोविंद जाधव म्हणाले.

COMMENTS