रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना ब्लड कॅन्सर ?

Homeताज्या बातम्यादेश

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना ब्लड कॅन्सर ?

मास्को/वृत्तसंस्था : रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांनी युक्रेनवर हल्ला करून युद्ध छेडल्यामुळे ते सातत्याने चर्चेत होते. मात्र आता पुतीन त्यांच्या आजारपणाम

कोविडचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी भाळवणीतील महत्वाचे रस्ते बंद
ओबीसींच्या हातात उत्तरप्रदेशच्या सत्तेची चावी
Solapur: शाळेच्या पहिल्या दिवशी सीईओ स्वामी यांनी घेतला क्लास…

मास्को/वृत्तसंस्था : रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांनी युक्रेनवर हल्ला करून युद्ध छेडल्यामुळे ते सातत्याने चर्चेत होते. मात्र आता पुतीन त्यांच्या आजारपणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. व्लादिमिर पुतीन यांना ब्लड कॅन्सर झाला असून ते गंभीर आजारी असल्याचा दावा एका ऑडिओ टेपमधील संभाषणाचा हवाला देत करण्यात आला आहे. रशियातील बिझनेस मॅगझीन ’न्यूज लाइन’मध्ये रशिया राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या आजारपणाचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. दोन रशियन व्यापाऱयांतील संवादाची ऑडिओ क्लिप हाती लागल्यानंतर संबंधित मासिकामधून हा दावा करण्यात आला. या संवादात पुतीन यांनी आपल्या हट्टापायी रशिया, युक्रेन आणि अन्य काही देशांची आर्थिक घडी पूर्णतः उद्ध्वस्त केली आहे. पुतीन यांच्यामुळे संपूर्ण जगाला अनेक समस्यांना सामारे जावे लागत असल्याचे म्हटले आहे. पुतीन आपल्या आजारपणामुळे युद्ध जिंकू शकणार नाहीत. आतापर्यंत 15 हजार रशियन सैनिक मारले गेले आहेत. मात्र यानंतर जरी पुतीन युद्ध जिंकले तरी त्यांना सत्तापरिवर्तनाला सामोरे जावे लागेल, असे या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे. याआधी युक्रेन सैन्याच्या गुप्तचर यंत्रणेनेही पुतीन यांना कॅन्सर झाल्याचा दावा केला होता.

COMMENTS