Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या तालुकाध्यक्षपदी यादवराव त्रिभुवन

कोपरगाव प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी आणि काँग्रेसची ध्येय धोरणे समाजातील तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी व

ओबीसी आरक्षण रद्द… बारा बलुतेदारांना फास.. l Lok News24
शाश्‍वत विकासासाठी बायोटेक्नॉलॉजी उत्तम पर्याय ः मोम्ना हेजमदी
पावसाअभावी शेतकरी हतबल

कोपरगाव प्रतिनिधी ः अहमदनगर जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी आणि काँग्रेसची ध्येय धोरणे समाजातील तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी विधिमंडळ पक्ष नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्षपदी कोपरगाव तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक यादवराव त्रिभुवन यांची निवड करण्यात आली.
जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सहविचार सभेत अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांच्या उपस्थित माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली. त्रिभुवन यांच्या या निवडीबद्दल माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र नागवडे, तालुका अध्यक्ष आकाश नागरे, किसान काँग्रेस विभागाचे तालुकाध्यक्ष विष्णु पाडेकर, महिला काँगेस अ.जा. विभागाच्या जिल्हा अध्यक्ष सविता विधाते, कोपरगाव तालुका सरचिटणीस रवींद्र साबळे, राहुल गवळी, रौनक अजमेरे, विजय मोरे, आदींनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहे. काँग्रेस पक्ष वाढीसाठी खेड्यापाड्यात जाऊन काम करणार असल्याचे यादवराव त्रिभुवन यांनी सांगितले.

COMMENTS