Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चौरंगीनाथ महाराजांच्या यात्रेचा श्रीफळ वाढवून शुभारंभ

कोपरगाव प्रतिनिधी ः करंजी पंचक्रोशीतील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले जागृत देवस्थान श्री चौरंगीनाथ महाराजांच्या अक्षयतृतीया पासून सुरू होणार

2500 शिक्षकांचा ऑनलाईन परीक्षेवर बहिष्कार
खेळाच्या माध्यमातून देशाचे नाव मोठे करा
बिनविरोधला ठेंगा…शिक्षक बँकेत चौरंगी लढत

कोपरगाव प्रतिनिधी ः करंजी पंचक्रोशीतील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले जागृत देवस्थान श्री चौरंगीनाथ महाराजांच्या अक्षयतृतीया पासून सुरू होणार्‍या यात्रेचा परंपरेनुसार गुढीपाडव्याच्या शुभदिनी गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व धर्मियांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून शुभारंभ करत सर्वानुमते यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी गणेश भाऊसाहेब भिंगारे, उपाध्यक्षपदी गोकुळ जाधव तर सचिवपदी बाळासाहेब भिंगारे यांची निवड करण्यात येऊन राजुभाई देसाई यांच्या सह गावातील उपस्थित जेष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते चौरंगीनाथ मंदिर जीर्णोद्धार कामाचे उदघाटन करण्यात आले.
याप्रसंगी यात्रा कमिटीचे कार्याध्यक्ष संतोष भिंगारे, कमिटी सदस्य देविदास भिंगारे, सांडुभाई पठाण, अनिल डोखे, अंबादास आगवन, लक्ष्मण शिंदे,राजू देसाई, सुनील जाधव, दादासाहेब भिंगारे, दगु नाना वाघ, बाळासाहेब भिंगारे, अजय भिंगारे, अप्पासाहेब भिंगारे, संतोष आगवन, अश्रफ इनामदार, योगेश भिंगारे, रवी गायकवाड, दादासाहेब जोर्वेकर, अतुल भिंगारे, हर्षल आगवन, तुळशीदास मलिक, विठ्ठल शेलके, राजू अगवन, सोमनाथ काकडे, आकाश भिंगारे, अल्ताफ इनामदार, नानासाहेब देवकर, गणेश मच्छिंद्र भिंगारे, सतीश भिंगारे, ज्ञानेश्‍वर शेळके, अविनाश भिंगारे, आनाजी पवार, राजू शेख, निलेश येवले, भिमराज कासार, दिगंबर जाधव, नंदू आगवन, रामदास चरमळ, अशोक पाईक, फकीर डोखे, वाल्मिक वाघ, जितेंद्र शेळके, अक्षय शहाणे, सुनील भिंगारे, रवी येवले, सतीश फापाळे, दादा कुहिले, अजय डोखे, शिवाजी डोखे आदींसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. करंजी पंचक्रोशीतील जागृत सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले श्री चांदवलीबाबा चौरंगीनाथ यात्रा गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून अक्षयतृतीयेच्या दिवशी मोठ्या उत्साहात पारंपरिक खेळ, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करत गावातील घराघरात जणू दिवाळीचा सणच साजरा होतो. या प्रसंगी सांडूभाई पठाण यांच्या सह उपस्थित सर्वांनी चौरंगीनाथ यात्रेविषयी माहिती देत जास्तीत जास्त भाविकांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले. तसेच या प्रसंगी देविदास भिंगारे यांनी होणार्‍या यात्रेची रूपरेषा सांगितली.

COMMENTS