आनंद चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन : लाखाची बक्षिसे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आनंद चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन : लाखाची बक्षिसे

नगर -  प.पू.आनंदऋषीजी म.सा. यांची जन्मभुमी असलेल्या चिचोंडी शिराळ (पाथर्डी) येथे शनिवार दि.6 नोंव्हेंबर 2021 पासून भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच

आरती केदार हिची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड
क्रिकेट खेळताना गुप्तांगाला चेंडू लागून तरुण जागीच ठार.
महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघात नगर जिल्ह्यातील खेळाडूंनी आपल्या खेळाचा दबदबा कायम राखला -आ.अरुणकाका जगताप

नगर – 

प.पू.आनंदऋषीजी म.सा. यांची जन्मभुमी असलेल्या चिचोंडी शिराळ (पाथर्डी) येथे शनिवार दि.6 नोंव्हेंबर 2021 पासून भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना संघासह वैयक्तिकरित्या लाखाची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहे.

या स्पर्धेतील विजेत्या प्रथम- 51 हजार, द्वितीय 31 हजार, तृतीय 21 हजार व चतुर्थ 11 हजारांचे पारितोषिके संघास देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मॅन ऑफ दी सिरिज, मॅन ऑफ दी मॅच असेही रोख पारितोषिकांसह चषक प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजक विठ्ठलप्रसाद तिवारी यांनी दिली.

या स्पर्धेसाठी एकनाथ आटकर, महादेव आव्हाड, अमोल वाघ, विठ्ठल गायकवाड, अर्जुन कुदळे, रविंद्र मुळे, सुहास आव्हाड, दिपक गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी मंगेश जर्‍हाड, खुशाल गिते, आयुब शेख, बबन गोरावडे, कैलास आव्हाड, प्रसन्न जर्‍हाड, प्रशांत गोरावडे, राजेंद्र आव्हाड, वैभव गरुड, नागेश आव्हाड, संतोष गरुड, अशोक कुदळे, उद्धव काळापहाड, वाकचौरे सर, ओंकार आव्हाड, गुलजार शेख आदि प्रयत्नशील आहेत.

या स्पर्धेत 32 संघांना प्रवेश दिला जाणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी विठ्ठलप्रसाद तिवारी (मो.9881322826) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

COMMENTS