Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रोटरी क्लब ऑफ जामखेडच्या सदस्यपदी प्रफुल सोळंकी

जामखेड : रोटरी क्लब ऑफ जामखेडच्या सदस्यपदी सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देणारे प्रफुल सोळंकी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल स

जामखेड शहरात 548-डी महामार्गाचा बोजवारा; चौकशीची मागणी
एकतर्फी प्रेमातून नृत्यांगनेवर कोयत्याने वार ;  गंभीर जखमी; जखेडमधील घटना
निलंबित स्वस्त धान्य दुकानदाराला धान्यपुरवठा?

जामखेड : रोटरी क्लब ऑफ जामखेडच्या सदस्यपदी सामाजिक कार्यात सातत्याने योगदान देणारे प्रफुल सोळंकी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रोटरी क्लब ही जगभर कार्यरत असलेली एक अग्रगण्य आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था असून ग्रामीण तसेच शहरी भागात विविध विकासात्मक व सेवाभावी उपक्रम राबविण्यात संस्थेचा मोलाचा वाटा आहे. सध्या 150 हून अधिक देशांमध्ये 45 हजारांहून अधिक रोटरी क्लब सक्रिय असून, विविध देशांतील सदस्यांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे, सामाजिक सलोखा वाढवणे आणि जागतिक शांततेसाठी कार्य करणे हे रोटरीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. समाजोपयोगी उपक्रमांमध्ये कायम सक्रिय असलेले प्रफुल सोळंकी यांच्या निवडीचे स्वागत रोटरी क्लब ऑफ जामखेडचे अध्यक्ष डॉ. प्रशांत गायकवाड, सचिव विकास पवळ, कोषाध्यक्ष डॉ. सादेख पठाण, उपाध्यक्ष अरुण उगले यांच्यासह डॉ. भरत देवकर, डॉ. सुशील पन्हाळकर, डॉ. विकी दळवी, डॉ. विद्या तोंडे, संभाजी मुळे व आनंद राजगुरू यांनी केले.

COMMENTS