Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे : डॉ. प्रतिभा पाचपुते

श्रीगोंदा : आजच्या धकाधकीच्या जीवनात महिला नोकरी व घराची जबाबदारी सांभाळताना कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घेतात; मात्र या धावपळीत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे पुढे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. महिलांनी स्वतःसाठी वेळ काढून योगा व प्राणायाम करावा, केमिकलविरहित अन्न सेवन करावे आणि आनंदी व निरोगी आयुष्यासाठी सर्वप्रथम स्वतःवर प्रेम करावे, असे प्रतिपादन परिक्रमा संकुलाच्या अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रतिभा पाचपुते यांनी केले. नगरपरिषद महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त पंतनगर येथील कम्युनिटी हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. पाचपुते यांनी महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण केली. घरातील स्त्री आजारी पडली तर संपूर्ण घर आजारी असल्यासारखे वाटते, त्यामुळे महिलांनी सर्वप्रथम स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी नगरपरिषदेच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना राबविण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच शहराच्या विकासासाठी महिलांनी दिलेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून त्यांची अंमलबजावणी केली जाईल, असे सांगितले.उपनगराध्यक्ष अलका अनुभुले यांनीही महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत नगरपरिषदेमार्फत महिलांचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमात महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून सुमारे ८० महिलांनी तपासणीचा लाभ घेतला. तसेच आयोजित करण्यात आलेल्या पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत पूनम मेहेर, दिशा सावंत व योगिता परदेशी यांनी क्रमांक पटकावला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल चव्हाण यांनी केले, तर दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवर महिलांच्या हस्ते करण्यात आले. शैलजा आपटे यांनी बचतगटांविषयी माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला व बालकल्याण सभापती मिरा शिंदे यांनी केले. या कार्यक्रमासाठी नगरपरिषदेचे सर्व समिती सभापती, नगरसेवक तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार महिला व बालकल्याण उपसभापती ऍड. दीपाली बोरुडे यांनी मानले.

खरातने पाच नरबळी दिल्याचा संशय; न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची पोलिस कोठडी
४५ गावांच्या पाणीपुरवठ्याचे स्वागत; मात्र १३ गावांच्या योजनेवर परिणाम नको : काकडे
एकनाथ वाडी-पाथर्डी बस सेवा सुरू करा; नागरिकांची मागणी ; आंदोलनाचा इशारा

श्रीगोंदा : आजच्या धकाधकीच्या जीवनात महिला नोकरी व घराची जबाबदारी सांभाळताना कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी घेतात; मात्र या धावपळीत स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे पुढे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. महिलांनी स्वतःसाठी वेळ काढून योगा व प्राणायाम करावा, केमिकलविरहित अन्न सेवन करावे आणि आनंदी व निरोगी आयुष्यासाठी सर्वप्रथम स्वतःवर प्रेम करावे, असे प्रतिपादन परिक्रमा संकुलाच्या अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य डॉ. प्रतिभा पाचपुते यांनी केले.

नगरपरिषद महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त पंतनगर येथील कम्युनिटी हॉलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. पाचपुते यांनी महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण केली. घरातील स्त्री आजारी पडली तर संपूर्ण घर आजारी असल्यासारखे वाटते, त्यामुळे महिलांनी सर्वप्रथम स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी नगरपरिषदेच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना राबविण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच शहराच्या विकासासाठी महिलांनी दिलेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून त्यांची अंमलबजावणी केली जाईल, असे सांगितले.उपनगराध्यक्ष अलका अनुभुले यांनीही महिलांना प्रेरणादायी मार्गदर्शन करत नगरपरिषदेमार्फत महिलांचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.

या कार्यक्रमात महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून सुमारे ८० महिलांनी तपासणीचा लाभ घेतला. तसेच आयोजित करण्यात आलेल्या पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत पूनम मेहेर, दिशा सावंत व योगिता परदेशी यांनी क्रमांक पटकावला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल चव्हाण यांनी केले, तर दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवर महिलांच्या हस्ते करण्यात आले. शैलजा आपटे यांनी बचतगटांविषयी माहिती दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला व बालकल्याण सभापती मिरा शिंदे यांनी केले.

या कार्यक्रमासाठी नगरपरिषदेचे सर्व समिती सभापती, नगरसेवक तसेच मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आभार महिला व बालकल्याण उपसभापती ऍड. दीपाली बोरुडे यांनी मानले.

COMMENTS