Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घरगुती गॅससाठी ‘ई-केवायसी’ बंधनकारक; प्रक्रिया न केल्यास अनुदान थांबण्याची शक्यता

मुंबई : देशातील घरगुती गॅस वापरणार्‍या कोट्यवधी ग्राहकांसाठी केंद्र सरकारने ओळख पडताळणीची ‘ई-केवायसी’ प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ही प्रक्रिया व

शेवगावमध्ये पाच हजार घरकुले रद्द होण्याची शक्यता; ३१ मार्चपर्यंत बांधकाम सुरू न केल्यास कारवाई; पंचायत समितीचा इशारा
श्रीगोंद्यात भर रस्त्यात गॅस सिलेंडर वितरण; नागरिकांची कोंडी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
माणिकदौंडीला जायकवाडी नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करा : पालवे


मुंबई : देशातील घरगुती गॅस वापरणार्‍या कोट्यवधी ग्राहकांसाठी केंद्र सरकारने ओळख पडताळणीची ‘ई-केवायसी’ प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास गॅसवर मिळणारे अनुदान थांबू शकते. तसेच दीर्घकाळ पडताळणी न केल्यास गॅस कनेक्शन निलंबित होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाच्या माहितीनुसार, घरगुती गॅसवरील अनुदान योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे आणि गैरव्यवहार टाळता यावा यासाठी आधार आधारित बायोमेट्रिक पडताळणी आवश्यक करण्यात आली आहे. ग्राहकांनी ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास त्यांना दरमहा मिळणार्‍या सुमारे 300 ते 400 रुपयांच्या अनुदानाचा लाभ गमवावा लागू शकतो. तसेच सिलिंडर बुक करताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना गॅस एजन्सीच्या कार्यालयात जावे लागत असे. मात्र आता तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहक घरबसल्या मोबाईलद्वारेही ही पडताळणी सहज पूर्ण करू शकतात. त्यामुळे एजन्सीच्या रांगा टाळून काही मिनिटांत ‘ई-केवायसी’ पूर्ण करणे शक्य झाले आहे. पडताळणीची प्रक्रिया पूर्ण न केल्यास गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये अडथळे येऊ शकतात. तसेच अनुदानाचा लाभ बंद होऊन ग्राहकांना सिलिंडरची संपूर्ण किंमत भरावी लागू शकते. दीर्घकाळ ‘ई-केवायसी’ प्रलंबित राहिल्यास गॅस कनेक्शन कायमस्वरूपी निलंबित होण्याची शक्यता असल्याने ग्राहकांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन संबंधित विभागाने केले आहे.

COMMENTS