Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

१० राज्यांतील राज्यसभेच्या २४ जागांसाठी निवडणूक जाहीर

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या २४ जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. जून-जुलै महिन्यात १० राज्यांतील राज्यसभेच्या २४ सदस्यांच

कडक टाळेबंदी पाळणे सर्वांच्या हिताचे : नगराध्यक्ष वहाडणे
काँग्रेसच्या गतवैभवासाठी कामाला लागा : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आवाहन
शेवगावात हिंदू जनआक्रोश मोर्चा; अत्याचार प्रकरणाचा निषेध करत अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय देण्याची मागणी
निवडणूक आयोगाकडून १० राज्यांतील २४ राज्यसभा जागांसाठी निवडणुका जाहीर.  महाराष्ट्र आहे का? #RajyaSabha #RajyaSabhaElection #Election2026

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या २४ जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली आहे. जून-जुलै महिन्यात १० राज्यांतील राज्यसभेच्या २४ सदस्यांचा कार्यकाळ संपत असून, या रिक्त होणाऱ्या जागांसाठी मतदान घेतले जाणार आहे. याशिवाय महाराष्ट्र आणि तमिळनाडू मधील दोन राज्यसभा जागांसाठी पोटनिवडणुकीचीही घोषणा करण्यात आली आहे.

ही राज्यसभा निवडणूक १० राज्यांमध्ये होणार आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांमध्ये प्रत्येकी ४ जागांसाठी, तर मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी ३ जागांसाठी मतदान होईल. याशिवाय झारखंडमध्ये २ जागांसाठी, तर मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरममध्ये प्रत्येकी १ जागेसाठी निवडणूक होणार आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ८ जून ठेवण्यात आली आहे. राज्यसभेच्या या जागांसाठी १८ जून रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. सध्याच्या सदस्यांचा कार्यकाळ २१ जून ते १९ जुलै या कालावधीत वेगवेगळ्या तारखांना संपत असल्यामुळे निवडणूक आयोगाने हे वेळापत्रक जाहीर केले आहे.

COMMENTS