Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फलटण पोलिसांकडून गुटखाविरोधी कारवाई; 11 जणांविरुध्द गुन्हा दाखल

फलटण : जप्त केलेल्या मुद्देमालसह पोलीस निरीक्षक धान्यकुमार गोडसे व पोलीस कर्मचारी. फलटण / प्रतिनिधी : फलटण ग्रामीण पोलिसांनी गुटखा विरोधात केलेल्य

वन्यप्राणी-मानवी संघर्ष टळण्यासाठी 664 पाणवठ्यांची निर्मिती
काँग्रेसचे शाश्‍वत विचारच देशाला तारणार : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
टाटा कमिन्स कंपनीचे दीड कोटीचे इंधन इंजेक्टरची चोरी
फलटण : जप्त केलेल्या मुद्देमालसह पोलीस निरीक्षक धान्यकुमार गोडसे व पोलीस कर्मचारी.

फलटण / प्रतिनिधी : फलटण ग्रामीण पोलिसांनी गुटखा विरोधात केलेल्या कारवाईत तंबाखूजन्य माल मुद्देमाल जप्त करत 11 जणांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी ग्रामीण पोलीस कर्मचारी यांना ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावात तंबाखूजन्य माल व गुटका विक्री होत असलेल्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश देऊन 11 ठिकाणी छापे टाकत कारवाई केली. यामध्ये पहिल्या कारवाईत साखरवाडी येथे पोपट तुकाराम ठोंबरे यांच्याकडे 100 रुपये किमतीच्या तंबाखूजन्य माल विक्री, दुसर्‍या कारवाईत साखरवाडी येथे महेश दत्तात्रय रोकडे यांच्याकडे 293 रुपये किमतीच्या तंबाखूजन्य माल, तिसर्‍या कारवाईत निंभोरे येथे मुकुंदा विष्णू कांबळे यांच्याकडे 300 रुपये किमतीचा तंबाखूजन्य माल, चौथ्या कारवाईत मिरगाव येथे हनुमंत किराणा दुकानात दादासो ज्ञानदेव खताळ यांच्याकडे 350 रुपये किमतीचा तंबाखूजन्य माल आढळून आला.
तसेच पाचव्या कारवाईत आसू येथे फिरोज मजीर महाल यांच्याकडे 725 रुपये किमतीचा तंबाखूजन्य माल, सहाव्या कारवाईत ढवळेवाडीत शैलेंद्र एकनाथ नलवडे यांच्याकडे 417 रुपये किमतीचा तंबाखूजन्य माल, सातव्या कारवाईत ढवळेवाडी दिनेश बुवा माने यांच्याकडे 400 रुपये किमतीचा तंबाखूजन्य माल विक्री, आठव्या कारवाईत सस्तेवाडी रघुनाथ मार्तंड पायगुडे यांच्याकडे 500 रुपये किमतीचा तंबाखूजन्य माल, नवव्या कारवाईत साखरवाडी संजय यशवंत देवकर यांच्याकडे 650 रुपये किमतीचा तंबाखूजन्य माल, दहाव्या कारवाईत, आसू येथे मनोहर दत्तात्रय पवार यांच्याकडे 450 रुपये किमतीचा तंबाखूजन्य माल, अकराव्या कारवाईत आसू येथे विजय ज्ञानदेव निंबाळकर यांच्याकडे 425 रुपये किमतीचा तंबाखूजन्य माल आढळून आला असून एकूण 11 जणांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धान्यकुमार गोडसे यांनी दिली आहे.

COMMENTS