Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सह्याद्री सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्त्या

फलटण / प्रतिनिधी : जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवीचे अध्यक्ष युवा नेते सह्याद्री सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार,

धारेश्‍वर दिवशी येथे गाईचे ढोहाळे जेवन कार्यक्रम थाटामाटात
कडकनाथ महाघोटाळ्याच्या महारयत कंपनीच्या संचालकाला अटक
महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर गृह राज्यमंत्र्यांकडून बंदोबस्तांची पहाणी

फलटण / प्रतिनिधी : जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवीचे अध्यक्ष युवा नेते सह्याद्री सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, दि 3 जून रोजी दुपारी 4 वाजता राजीव गांधी पॉलीटेक्निक कॉलेज फलटण येथे भव्य कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
या कुस्ती आखाड्यात उपमहाराष्ट्र केसरी पै. विशाल उर्फ प्रकाश बनकर गंगावेस तालुका कोल्हापूर व हरियाणा केसरी पैलवान बंटी हरियाणा यांच्यामध्ये इनाम 2 लाख रुपयांची कुस्ती होणार आहे. छत्रपती आखाडा कुर्डूवाडी येथील पै. महारुद्र काळेल व महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके तालमीचा पैलवान मुन्ना झुंझुर्के यांच्यामध्ये इनाम 1 लाख 50 हजाराची कुस्ती होणार आहे.
पै. जयदीप गायकवाड( वाखरी) व पै. नागेश शिंदे (ता. सह्याद्री संकुल पुणे) यांच्यात 1 लाखाची कुस्ती होणार आहे होणार आहे. तसेच पै. मनोज माने (कुर्डूवाडी) व पै. शंकर बंडगर (म. के. अभिजीत कटके तालुका पुणे) यांच्यात इनाम 1 लाखाची कुस्ती होणार आहे. पै. आकाश माने व पै. सागर शिंदे यांच्यात इनाम 50 हजार रुपयाची कुस्ती होणार आहे. पै. तुषार सरक व पैलवान विकास शिंदे यांच्यामध्ये इनाम 30 हजार रुपयाची कुस्ती होणार आहे. पै. गणेश कोकरे व पै. निकेतन पाटील यांच्यात इनाम 20 हजार रुपयाची कुस्ती होणार आहे. पै. संदेश शिपकुले व पै. ओंकार कोकाटे यांच्यात इनाम 15 हजार रुपयाची कुस्ती होणार आहे. मैदानाची रंगत वाढवण्यासाठी निवेदक शंकर आण्णा पुजारी व राजू आवळे इचलकरंजी यांची हलगी कडाडणार आहे.
दुपारी 2 ते 4 या वेळेत लहान कुस्त्या जोडल्या जाणार आहेत. याबरोबरच 12 चटकदार कुस्त्या होणार आहेत. राजीव गांधी पॉलीटेक्निक कॉलेज गिरवी रोड, झिरपवाडी, ता. फलटण, जि. सातारा येथे शुक्रवार, दि. 3 जून रोजी सायंकाळी 4 वाजता भव्य कुस्ती आखाडा भरवण्यात येणार आहे.
या मैदानासाठी महाराष्ट्र केसरी बापूदादा लोखंडे महाराष्ट्र केसरी गोरख सरक, उपमहाराष्ट्र केसरी चंद्रकांत सूळ, उपमहाराष्ट्र केसरी आबा सूळ उपस्थित रहाणार आहेत. कुस्ती शौकिनांनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS