Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चिनी तैपईला नमवून व्हिएतनामचा फिफा विश्‍वचषक स्पर्धेत प्रवेश

नवी मुंबई / प्रतिनिधी : नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात व्हिएतनामने एएफसी वुमन्स आशिया कप भारत 2022 स्पर्धेच्या प्

क्रिकेटर कैया अरुआचे वयाच्या 33 व्या वर्षी निधन
पंचांच्या खराब कामगिरीमुळे दिल्लीच्या विजयाला गालबोट 
शकुर पैलवान चुडीवाला स्मृतीप्रित्यर्थ किरण काळे यांच्याकडे मानाची गदा सुपूर्द

नवी मुंबई / प्रतिनिधी : नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात व्हिएतनामने एएफसी वुमन्स आशिया कप भारत 2022 स्पर्धेच्या प्ले ऑफ लढतीत चिनी तैपईचे कडवे आव्हान 2-1 गोलने परतावले. या विजयासह व्हिएतनामने सन 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या यजमानपदाखाली होणार्‍या फिफा विश्‍वचषक स्पधेर्चे तिकिट मिळवले. विश्‍वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच व्हिएतनामने पात्रता मिळवली असल्याने त्यांची कामगिरी ऐतिहासिक ठरली.
चेउंग थियू कियूने सातव्या आणि एनग्युयेन थी बिच थूय हिने 56 व्या मिनिटाला गोल करत व्हिएतनामच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. चिनी तैपईकडून एकमेव गोल हेइ सुआनने दुसर्‍या सत्रात केला. या पराभवानंतर चिनी तैपई संघ आता इंटर-कॉन्फेडरनेश प्ले ऑफ लढतीत थायलंडविरुध्द खेळतील. या लढतीत विजय मिळवल्यास 31 वर्षांत पहिल्यांदाच चिनी तैपई संघ फिफा महिला विश्‍वचषक स्पर्धेची पात्रता गाठतील.
शुक्रवारी थायलंडला 3-0 गोलने नमविलेल्या चिनी तैपईला विश्‍वचषक पात्रता मिळवण्यासाठी व्हिएतानमविरुध्द केवळ बरोबरी साधण्याची आवश्यकता होती. परंतू, व्हिएतनामने आक्रमक सुरुवात करता चिनी तैपईला बचावात्मक पवित्रा घेण्यास भाग पाडले. सातव्या मिनिटाला चिनी तैपईचा बचाव भेदण्यात व्हिएतनामला यश आले. चेउंग थियू कियूने गोल करत व्हिएतनामला 1-0 गोल अशी आघाडी मिळवून दिली.
पहिल्या गोलनंतर व्हिएतनामच्या संघात उत्साहात संचारला आणि त्यांनी 19 व्या मिनिटालाही गोल करण्याची संधी निर्माण केली. मात्र, चेन-पिंगने व्हिएतनामचे आक्रमण रोखले. यानंतर पहिल्या सत्रात कोणलाही गोल करता आला नाही. चिनी तैपईने दुसर्‍या सत्रात शानदार खेळ करताना गोल केला. 49व्या मिनिटाला सू हेइ सुआनने डाव्या कॉर्नरने गोल करत चिनी तैपईला 1-1 गोल बरोबरी साधून दिली. यावेळी चिनी तैपईने सामन्यावर चांगले नियंत्रण मिळवले.
परंतू, 56 व्या मिनिटाला एनग्युयेन थी बिच थूय हिने शानदार गोल करत व्हिएतनामला 2-1 गोल असे आघाडीवर नेले. व्हिएतनामने यानंतर भक्कम बचावाचे प्रदर्शन करत अखेरपर्यंत आघाडी कायम राखली आणि विजय मिळवला. या निर्णायक गोलच्या जोरावर व्हिएतनामने फिफा विश्‍वचषक स्पर्धेची पात्रता मिळवली.

COMMENTS