Homeताज्या बातम्या

मुंबई उपनगरी रेल्वेत महिलेला बेदम मारहाण

मुंबई : मुंबईच्या उपनगरी रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. आसनावरून झाले

नरहरी सेनेच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात
लोकसभा अध्यक्षपदासाठी जेडीयूची तयारी
गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्र  
राहुरीतील घोरपडवाडीत महिलेला बेदम मारहाण


मुंबई : मुंबईच्या उपनगरी रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. आसनावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट मारहाणीत झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून, एका पुरुष प्रवाशाने महिला प्रवाशाला शिवीगाळ करत मारहाण केल्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. या घटनेनंतर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ही घटना उपनगरी रेल्वेच्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी असलेल्या डब्यात घडली. संबंधित महिला रिकाम्या आसनावर विसावली होती. त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला. काही क्षणांतच हा वाद उग्र बनला आणि पुरुष प्रवाशाने महिलेवर हात उगारल्याचे चित्रफितीत दिसून येते. मारहाणीदरम्यान संबंधित व्यक्तीने महिलेला अश्‍लील शिवीगाळ केली. तसेच कमरेचा पट्टा काढून धमकावल्याचेही चित्रफितीत दिसत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे रेल्वेतील महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेतील आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे, डब्यात अनेक प्रवासी उपस्थित असूनही कोणीही तातडीने हस्तक्षेप करून वाद थांबवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत नाही. बहुतांश प्रवासी केवळ हा प्रकार पाहत राहिल्याचे चित्रफितीत दिसून येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

COMMENTS