जळगावसह राज्यभरात अतिवृष्टीमुळे हाहाकार ; अनेक गावांना पूराचा वेढा ; कन्नड-चाळीसगाव घाटात दरड कोसळली

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जळगावसह राज्यभरात अतिवृष्टीमुळे हाहाकार ; अनेक गावांना पूराचा वेढा ; कन्नड-चाळीसगाव घाटात दरड कोसळली

जळगाव/मुबई - संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू असून, आगामी 3-4 दिवस राज्यभरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सोमवारी रात्रीप

पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूची नियुक्ती रद्द करा
अतिवृष्टीच्या अनुदान वाटपात भेदभाव नको ः शिंदे
चोपडा तालुक्यात झालेल्या वादळामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान शेतकरी हवालदिल

जळगाव/मुबई – संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू असून, आगामी 3-4 दिवस राज्यभरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सोमवारी रात्रीपासून विविध जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला असून, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, मुंबई, पुणेसह विविध जिल्ह्यात मोठया प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. मुंबई व्यतिरिक्त जळगाव चाळीसगाव परिसर, औरंगाबादमधील कन्नड घाटाजवळ पावसाने कहर केला आहे. नदी -नाल्यांना पूर आला असून कन्नड घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
मुसळधार पावसामुळे, अनेक जिल्ह्यात हाहाकार माजला असून, पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. जळगाव मधील चाळीसगाव तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे. या तालुक्यातील अनेक गाव पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार पावसामुळे या तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जवळपास 500 ते 600 जनावरे वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच काही लोक वाहून गेल्याची देखील माहिती मिळत आहे.
चाळीसगाव तालुक्यात जवळपास पंधरा गावांमध्ये पाणी शिरेल आहे. तसेच जनावरे वाहून गेल्याच्या वृत्ताला प्रशासनाने दुजोरा दिला आहे. तालुक्यात अनेक गावांमध्ये अद्यापही पाणी साचलेले आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. तालुक्यात अनेक पुल देखील पाण्याखील गेली आहेत. त्यामुळे याचा वाहतूकीवर परिणाम मोठा परिणाम झाला आहे. हे पाणी नागरी वस्तींमध्ये शिरल्यामुळे अनेक ठिकाणी बाजारपेठा देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. मोठी जीवित आणि वित्तहानी झाल्याची प्राथमिक माहिती सध्या मिळत आहे.
चाळीसगाव येथील पूरपरिस्थितीवर बोलतांना आमदार मंगेश चव्हाण म्हणाले, स्थानिक लोकांशी माझे बोलणे झाल आहे. प्रशासनातील अधिकार्‍यांसोबत आम्ही घाटात आहोत. या ठिकाणी मोठ्या दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे रस्ता मोकळा करण्याचे काम सुरु आहे. 500 ते 600 गुरे पाण्यामध्ये वाहून गेली आहेत. तर काही दगावली आहेत. तसेच सकाळपासून 3 ते 4 मृतदेह मी बघितले आहेत. त्यामुळे 8 ते 10 लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व प्रशासन कामाला लागले आहे. या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे केल्यानंतर ते कळेल. पंचनामे करण्याच्या सुचना महसूल विभागाला केल्या आहेत. तालुक्यातील 8 ते 10 गावांना या पुराचा फटका बसला असल्याचे त्यांनी सांगितले.

नांदेडमध्ये दोन महिलांचा मृत्यू
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सावरगाव (नसरत) येथे सोमवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. बैलगाडीत घराकडे निघालेल्या पाच जणांपैकी दोन महिला सावरगाव येथील नदीच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत. यातील मणकर्णाबाई बापुराव दगडगावे, (वय 52) यांचा पार्थिव हुलेवाडी येथील पुलालगत आढळले. तर पार्वतीबाई संभाजी दगडगावे (वय 45) यांचे पार्थिव पालम तालुक्यातील पेंडू येथे आढळले.

COMMENTS