Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजित पवारांचा पक्षासह चिन्हावर दावा

पक्षात बहुमताला महत्व असून एकमताने निर्णय घेतल्याचा दावा

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात रविवारी राष्ट्रवादी काँगेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनातातील वाढीसाठी प्रस्ताव तयार करा
 कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र काय असा-तसा वाटला का ? 
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा – अजित पवार

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात रविवारी राष्ट्रवादी काँगेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली, यात त्यांनी थेट राष्ट्रवादी काँगे्रस पक्षावर दावा केला असून, आम्ही पक्ष म्हणून सत्तेत सहभागी झाल्याचा दावा केल्यामुळे खळबळ उडाली आहे. तसेच त्यांनी आगामी निवडणुका या पक्षाचे चिन्ह घडयाळ यावर निवडणूक लढणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
शपथ घेण्यापूर्वी आम्ही पक्षातील सर्व ज्येष्ठ नेत्यांशी बोलल्यानंतरच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपल्या सर्व आमदारांचा पाठिंबा असल्याचे देखील सांगितले, यावेळी पत्रकारांनी किती आमदारांचा पाठिंबा असल्याचे विचारल्यानंतर त्यांनी सर्व आकडा सांगण्याऐवजी सर्व आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये भविष्यात पक्ष नेमका कुणाचा यावरून मतभेद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आपली भूमिका स्पष्ट करतांना अजित पवार म्हणाले की, मजबुतीने मोदी साहेब देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. सगळे विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करीत आहेत. देशाला आणि राज्याला खंबीर नेतृत्वाची गरज आहे. शुक्रवारी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आणि आज सरकारला पाठिंबा दिला. इथून पुढच्या काळात तरुणांना संधी देणे गरजेचे आहे. अडीच वर्षे सरकारमध्ये काम करत असतांना छगन भुजबळ हेसुध्दा सोबत काम करत होते. आता ते सोबत आलेले आहेत. काही जण टीका करत आहेत. परंतु महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सहभागी झालेलो आहोत. इथून पुढच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच लढणार असून पक्ष बळकटीकरणासाठी काम करणार आहोत, असे अजित पवार म्हणाले.भुजबळ साहेब आता बरोबर आहेत. आम्हाला काही टीका टिप्पणीचे वाटत नाही. महाराष्ट्र राज्य डोळ्यासमोर आहे. त्याचा विकास करायचा आहे. प्रत्येक आमदारांना आमचा निर्णय मान्य आहे. उद्याच्या काळात आम्ही पक्ष म्हणून समोर येणार आहोत. कुठल्याही निवडणूका असोत त्याच पक्षाच्या चिन्ह, नाव यातून निवडणूका लढवणार असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS