Homeताज्या बातम्यादेश

संसदेची सुरक्षा भेदत दोघांनी घातला गोंधळ

लोकसभेतील प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारत उडवले स्मोक कँडल

नवी दिल्ली ः भारतीय संसदेवर 13 डिसेंबर 2001 रोजी हल्ला झाला होता, या हल्ल्याला 12 वर्ष बुधवारी पूर्ण होत असतांनाच, याचदिवशी दोन तरूणांनी संसदेची

आपल्या उमेदवारांला मताधिक्य देण्यासाठी कार्यकर्त्यांचा जोर
डिसले गुरुजी राजीनाम्यावर ठाम
जनतेचे प्राण वाचवण्याला प्राधान्य दिले हा संदेश जगाला देऊया : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नवी दिल्ली ः भारतीय संसदेवर 13 डिसेंबर 2001 रोजी हल्ला झाला होता, या हल्ल्याला 12 वर्ष बुधवारी पूर्ण होत असतांनाच, याचदिवशी दोन तरूणांनी संसदेची सुरक्षाव्यवस्था भेदत थेट लोकसभेत उड्या मारल्या. एवढ्यावरच न थांबता या तरूणांनी थेट लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने जात, पायाच्या बुटात लपवून आणलेल्या पिवळ्या रंगाचे स्मोक कँडल लोकसभेत उडवले. यामुळे सगळीकडे धूर झाल्यामुळे गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. मात्र खासदारांनीच या दोघांना चोप दिल्यानंतर सुरक्षारक्षकांनी या तरूणांना ताब्यात घेतले. यावेळी लोकसभा काही काळासाठी स्थगित करण्यात आली होती.  
लोकसभेचे कामकाज बुधवारी सुरू असतांना दोन अज्ञात व्यक्ती सभागृहात शिरले. प्रेक्षक गॅलरीतून हे दोघे सभागृहात आले. सुरक्षा व्यवस्था भेदून सभागृहात आले आणि खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावू लागले होते. यावेळी पिठासीन अध्यक्षांनी या दोघांना पकडण्यास सांगितले. काही खासदार या दोघांना पकडण्यासाठी धावले. दरम्यान, पिठासीन अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी लोकसभा दोन वाजेपर्यंत स्थगित केली होती. हा गोंधळ पाहून सर्व खासदार सभागृहाबाहेर पडले. यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंतही बाहेर आले आणि त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, लोकसभेचे कामकाज सुरू असतांना अचानक दोन जण प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात आले. एका खांबाच्या मदतीने ते प्रेक्षक गॅलरीतून खाली आले. दोघांनी लागोपाठ उड्या मारल्या. मग दोघेही खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत धावत होते. तेवढ्यात त्यातल्या एकाने बूट काढले, तो बूट काढत होता तेव्हा काही खासदारांनी त्याला घेरले. त्याचप्रमाणे दुसर्‍या इसमालाही पकडले. त्याचवेळी सभागृहात गॅस पसरू लागला. पिवळ्या रंगाचा गॅस दिसत होता. तो गॅस कसा आला ते माहिती नाही. पण या गॅसमुळे नाकाला आणि डोळ्यांना त्रास होत होता. सुरक्षारक्षकांनी या दोन्ही इसमांना ताब्यात घेतले आहे. खासदार दानिश अली म्हणाले, तानाशाही नहीं चलेगी (हुकूमशाही चालणार नाही) अशा घोषणा हे दोघे देत होते. प्राथमिक माहितीनुसार म्हैसूरच्या एका खासदारांच्या पासवर हे दोघे प्रेक्षक गॅलरीपर्यंत आले होते. या खासदाराला चौकशीसाठी बोलावले आहे. हे दोन जण सभागृहात धावत असतांना खासदारांनी त्यांना पकडले. त्याआधी या दोघांनी बूटातून काहीतरी काढले आणि सभागृहात धूर पसरू लागला. या दोघांना पकडल्यानंतर खासदारांनी दोघांनाही चोप दिला. त्यापैकी एकाचे नाव सागर असे सांगितले जात आहे. म्हैसूरचे खासदार प्रतापराव सिंह यांच्या मदतीने या दोघांनी प्रेक्षक सभागृहाचा पास बनवून घेतला होता.

लातूरच्या तरूणासह एक तरूणी अटकेत – संसदेमध्ये गोंधळ घातल्यामुळे दोघांना ताब्यात घेतले असतांनाच, दुसरीकडे लोकसभेबाहेर कलर स्मोक अर्थात रंगीत धुराच्या नळकांड्या घेऊन आंदोलन केल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यापैकी एक जण महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातला आहे. लोकसभेबाहेरील नियमबाह्य आंदोलनामुळे पोलिसांनी एक महिला आणि एका पुरुष आंदोलकाला ताब्यात घेतले आहे. यामध्ये नीलम कौर सिंह ही 42 वर्षीय महिला हिस्सार हरियाणातील आहे. तर 25 वर्षीय अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. हे दोन्हीही आरोपी दिल्लीतील संसदेबाहेर ट्रान्सपोर्ट भवन इथे आंदोलन करत होते. या दोघांकडे कलर स्मोक होते. त्यामुळे नीलम कौर सिंह आणि अमोल शिंदे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

COMMENTS