Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जुन्नरमध्ये बसच्या अपघातात दोघांचा मृत्यू

पुणे : राज्यात अपघातांची मालिका सुरूच असून, रविवारी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे बस आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झ

रत्नागिरी – नागपूर महामार्गांवर बोलेरो आणि विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरची धडक
भीषण अपघात ! तब्बल १५० फूट खोल दरीत कोसळला ट्रक.
समृद्धीवरील अपघातात चौघांचा मृत्यू

पुणे : राज्यात अपघातांची मालिका सुरूच असून, रविवारी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे बस आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून 15 प्रवासी जखमी आहेत. जुन्नर तालुक्यातील नगर-कल्याण महामार्गावर ओतूरजवळ कार आणि एसटीबसचा भीषण अपघात झाला आहे.
 या घटनेत एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने बसमधील प्रवाशांना चांगलाच हादरा बसला. या दुर्घटनेत कारमधील दोघांचा जागीच मृत्यु झाला असून एसटी बसमधील 15 प्रवासी जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पोलीस व प्रशासनाला सूचना केल्या. त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे. अपघातातील जखमींना जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघात झालेली एसटी बस पारनेरवरुन मुंबईकडे तर, कार आळेफाट्याकडे जात असताना ओतुरजवळ हा अपघात झाला. बसमधील जखमींना प्राथमिक उपचारासाठी आळेफाटा आणि ओतुर येथे दाखल करण्यात आले आहे.

COMMENTS