राज्यपाल येता घरा…कोश्यारींच्या आजच्या दौर्‍यानिमित्त हिवरे बाजारमध्ये साफसफाई

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यपाल येता घरा…कोश्यारींच्या आजच्या दौर्‍यानिमित्त हिवरे बाजारमध्ये साफसफाई

अहमदनगर/प्रतिनिधी -देशविदेशातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून पायधुळ झाडताना लोकसहभागातून साधलेल्या ग्रामविकास मॉडेलचे भरभरून कौतुक मिळव

शेतकर्‍यांची वीज तोडल्यामुळे महावितरणला ठोकले ठाळे
राष्ट्रीय जल अकादमीत’पाणी’ विशेषांकाचे प्रकाशन
काकडी विमानतळाच्या नाईट लँडिगचा प्रश्‍न सुटला

अहमदनगर/प्रतिनिधी -देशविदेशातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून पायधुळ झाडताना लोकसहभागातून साधलेल्या ग्रामविकास मॉडेलचे भरभरून कौतुक मिळवलेल्या नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरेबाजारमध्ये बुधवारी (27 ऑक्टोबर) दिवसभर लगबग सुरू होती. निमित्त होते- महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या गुरुवारी (28 ऑक्टोबर) होणार्‍या गावभेटीचे. आदर्शगाव योजना कार्य समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी ग्रामस्थांच्या मदतीने गावभर विशेष स्वच्छता मोहीम राबवली. सायंकाळी चकाचक झालेले गाव राज्यपाल कोश्यारींच्या स्वागतासाठी सफा झाले.
आदर्श गाव हिवरे बाजार येथे दिनांक 28 ऑक्टोबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भेट देणार आहेत. कोरोनाच्या दीड-पावणेदोन वर्षांच्या निर्बंधांच्या काळात कोणीही व्हीआयपी गावात आला नसल्याच्या पार्श्‍वभूमीवर आता थेट राज्यपाल येत असल्याने हिवरे बाजार येथील ग्रामपंचायत सदस्य, मुंबादेवी सहकारी दूध उत्पादक संस्थेचे सभासद, यशवंत कृषी ग्राम व पाणलोट विकास संस्था कर्मचारी, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सभासद, यशवंत माध्यमिक विद्यालय शिक्षक व विद्यार्थी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक व विद्यार्थी तसेच गावातील महिला व पुरुष यांच्या लोकसहभागातून व्ही.आय.पी.दौर्‍याची तयारी केली गेली आहे, अशी तयारी प्रत्येक व्हीआयपी दौर्‍याच्यावेळी केली जाते, अशी माहिती उपसरपंट पोपटराव पवार यांनी दिली. याअंतर्गत गावातील सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता, रंगरंगोटी, सजावट व कार्यक्रम नियोजन यांचा समावेश असतो. या पद्धतीने बुधवारी दिवसभर विविध कामे लोकसहभागातून केली गेली असून, गुरुवारी राज्यपाल कोश्यारी यांच्यासमोर गावाने मागील 20-25 वर्षात लोकसहभागातून केलेले सर्वांगीण विकासाचे काम मांडले जाणार आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, गुरुवारी दुपारी 2 वाजता राज्यपाल कोश्यारी हिवरे बाजार येथे येणार असून, सुमारे तासभर ते गावात थांबणार आहेत. हिवरेबाजारच्या ग्रामविकासाची पाहणी व गावकर्‍यांसह पवार यांच्याशी त्यांचा संवादही होणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता ते पारनेर तालुक्यातील राळेगण सिद्धी येथे जाणार असून, सुमारे दीड तास तेथे थांबून व तेथील ग्रामविकासाची माहिती जाणून घेणार आहेत. सायंकाळी साडेचार वाजता ते राळेगण सिद्धी येथून हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होणार आहेत.

COMMENTS