Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वैष्णोदेवीचं दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला! दिल्ली मुंबई एक्सप्रेस-वेवर कार जळून खाक …

https://www.youtube.com/watch?v=5x3HQdSKUzM एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर वैष्णोदेवीचे दर्शन घे

साकुरीत फरसाणच्या कारखान्याला भीषण आग
तामिळनाडूत फटाका कारखान्यात भीषण स्फोटात 16 कामगारांचा मृत्यू
लखनऊमध्ये आगीचे तांडव! २० हून अधिक सिलेंडरचे स्फोट आणि शेकडो संसार खाक

एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या एका कुटुंबावर काळाने झडप घातली आहे. धावत्या कारला आग लागल्याने एकाच कुटुंबातील पाच जण जिवंत जळाले असून, या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हा भीषण अपघात काल रात्री ११ वाजेच्या सुमारास अलवरमधील मौजपूर येथे घडला. मध्य प्रदेशातील श्योपूर येथील हे कुटुंब आपल्या मुलाला नोकरी लागल्याचा नवस फेडण्यासाठी वैष्णोदेवीला गेले होते. दर्शन घेऊन आनंदाने परतत असताना अचानक त्यांच्या इर्टिगा कारने पेट घेतला. ही आग इतकी भीषण होती की, बचाव पथकाला गाडीत केवळ मानवी हाडांचे सांगाडे सापडले.

COMMENTS