Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांगलीत लग्नाच्या आनंदावर विरजण; येरळा नदीत पोहताना ८ मुलं बुडाली

https://www.youtube.com/watch?v=pIVL15LW6Rg सांगली जिल्ह्यातून एक अत्यंत सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. लग्नासाठी पाहुणे म्हणून आलेल्या एका कु

विष्णुपुरीतील उड्डाणपुलाचा भाग कोसळला; 2 विद्यार्थिनी जखमी, निकृष्ट कामावर संताप
दिल्लीतील साकेत नगरमध्ये ३ मजली इमारत कोसळली; थरारक व्हिडिओ समोर!। लोकमंथन News२४
कैलास टेकडीकडे जाणार्‍या भाविकांचा ऑटो पलटी; चालकासह 8 जण गंभीर जखमी

सांगली जिल्ह्यातून एक अत्यंत सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. लग्नासाठी पाहुणे म्हणून आलेल्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. वडिलांना नदीत बुडताना पाहून त्यांना वाचवण्यासाठी उडी घेतलेल्या २० वर्षीय मुलीचा दुर्दैवी अंत झाला आहे.
सांगलीच्या खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील शिकलगार मळ्यामध्ये ही घटना घडली. येथे एका लग्न समारंभासाठी मुंबई आणि कोरेगाव येथून पाहुणे आले होते. लग्नाचा सोहळा सुरू असतानाच काही लहान मुलं आणि त्यांचे पालक जवळच असलेल्या येरळा नदीवर पोहण्यासाठी गेले.
मुले पाण्यात खेळत असताना अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने ८ ते १० मुले खोल प्रवाहात वाहू लागली. हे पाहून काठावर उभ्या असलेल्या पालकांनी आणि इतरांनी त्यांना वाचवण्यासाठी नदीत उड्या घेतल्या. या गोंधळात सात ते आठ मुले बुडत होती.

COMMENTS