Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाळवा महिला राष्ट्रवादीतर्फे केंद्र सरकारचा निषेध

इस्लामपूर : नायब तहसिलदारांना निवेदन देताना जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, शहराध्यक्षा रोझा किणीकर. समवेत कमल पाटील, अलका माने, वैशाली पाटील व महिला पद

माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या पक्ष प्रवेशापूर्वीच नाईक बंधू राष्ट्रीवादीच्या कार्यक्रमास हजर
विश्‍वास साखर कारखान्याकडून प्रतिटन तीन हजार रुपये वर्ग
संगमनेर शहरात त्या ठिकाणी दुषित जलशुद्धीकरण संयंत्राला स्थानिकांचा विरोध

इस्लामपूर / प्रतिनिधी : देहू येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदीर लोकार्पण सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी नाकारून संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा अपमान केल्याबद्दल सांगली जिल्हा व इस्लामपूर शहर महिला राष्ट्रवादीने इस्लामपूर येथील राष्ट्रवादी भवनसमोर भाजपा केंद्र शासन व पंतप्रधान कार्यालयाचा जाहीर निषेध केला. यावेळी इस्लामपूर तहसिलदार कार्यालयात निषेधाचे निवेदनही देण्यात आले. जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, शहराध्यक्षा रोझा किणीकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी निषेधाच्या घोषणांनी परिवार दणाणून सोडण्यात आला.
देहू येथे मंगळवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत संत तुकाराम महाराज शिळा मंदीर लोकार्पण सोहळा झाला. या समारंभात भाजपाचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना भाषणाची संधी देण्यात आली. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी नाकारण्यात आली. हा केवळ ना. अजित पवार यांचा नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेचा अपमान आहे. त्याबद्दल भाजपा केंद्र शासन व पंतप्रधान कार्यालयाचा जाहीर निषेध करतो, असे निवेदनात म्हंटले आहे.
आमचा सच्चा दादा यांना चालेना आणि फेकू फडणवीस थांबेना; पातळयंत्री भाजपाचे करायचे काय? खाली डोके, वर पाय, वा…रे मोदी तेरा खेल, फेकू फडणवीससेही तेरा मेल; केंद्रीय यंत्रणा, निवडणूक आयोग, सीबीआयचा गैरवापर, हा तर भाजपचा रडीचा डाव आदी घोषणांनी महिला कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी प्रदेश सदस्या कमल पाटील, जिल्हा उपाध्यक्षा अलका माने, जिल्हा सरचिटणीस मंजुषा पाटील, जिल्हा प्रतिनिधी सायली गोंदिल, शैलजा जाधव, तालुका उपाध्यक्षा वैशाली पाटील, तालुका चिटणीस सविता पाटील, तालुका प्रतिनिधी रेखा पवार, शिरटे अध्यक्षा इंदिरा देसाई आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

COMMENTS