Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विश्‍वास साखर कारखान्याकडून प्रतिटन तीन हजार रुपये वर्ग

शिराळा / प्रतिनिधी : चिखली, ता. शिराळा येथील विश्‍वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याकडून गळीत हंगाम 2022-23 साठी आलेल्या ऊसाला प्रतिटन रुपये 300

शाहुनगरी फौंडेशनचा महाराणी येसूबाई पुरस्कार पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना जाहीर
सदरबझार परिसरात पाणी पुरवठा विस्कळीत; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर
दुय्यम निबंधक कार्यालयातील लिपिकावर कारवाई

शिराळा / प्रतिनिधी : चिखली, ता. शिराळा येथील विश्‍वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याकडून गळीत हंगाम 2022-23 साठी आलेल्या ऊसाला प्रतिटन रुपये 3000/-प्रमाणे वर्ग करण्यात आले आहेत, अशी माहिती अध्यक्ष, आ. मानसिंगराव नाईक यांनी दिली. आज संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्यासह सर्व संचालक व कार्यकारी संचालक अमोल पाटील उपस्थित होते.
ते म्हणाले, वरील निर्णय संचालक मंडळाच्या झालेल्या बैठीत घेण्यात आला आहे. चालू गळीत हंगामात कारखान्याने 7 लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट ठेवले आहे. नोंदीनुसार तोडी देण्यात येत आहेत. तोडणी व वातुकीची यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहे. शेतकर्‍यांची कोणत्याही तक्रार येणार नाही, अशा पध्दतीने तोडणी कार्यक्रम राबविला जात आहे. 2 डिसेंबर अखेर 1 लाख 63 हजार 670 टन ऊसाचे गापळ झाले तर, 1 लाख 77 हजार 400 क्िंवटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे.
आ. नाईक म्हणाले, प्रत्येक वर्षी शेतकर्‍यांनी पिकवलेल्या ऊसाला जास्तीत-जास्त दर देण्याचा संचालक मंडळाने प्रयत्न केला आहे. ऊस विकासासाठी विविध उपक्रम कारखान्यामार्फत राबिविले जात आहेत. बांधावर जाऊन आधुनिक शेतीचे शिक्षण व माहिती, ठिबक सिंचन अनुदान, पतीवर खते, बियाणे व औषधे शेतकर्‍यांना पुरविली जात आहे.

COMMENTS