Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत नगरच्या विराज पिसाळ ने पटकाविले सुवर्णपदक

नगर (प्रतिनिधी)- येथील खेळाडू विराज गजेंद्र पिसाळ याने उत्तराखंड येथे राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. विराज हा अहिल्यानगरचा ताय

नगरपरिषदा, नगरपंचायती, औद्योगिक नगरीतील स्थावर मालमत्तांच्या भाडेपट्ट्यांच्या नियमांत बदल
मुंबईत ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चे भव्य आयोजन;
रायगडमध्ये तटकरे-गोगावले वाद टोकाला
Displaying MIR_2877.jpeg

नगर (प्रतिनिधी)- येथील खेळाडू विराज गजेंद्र पिसाळ याने उत्तराखंड येथे राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. विराज हा अहिल्यानगरचा तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन व एकलव्य तायक्वांदो अकॅडमीचा खेळाडू असून, त्याने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून यश संपादन केले. येणाऱ्या एशियन युथ गेमसाठी विराजची भारतीय संघात नाव निश्‍चित होण्यास सर्वांच्या अपेक्षा लागल्या आहेत.
इंडिया तायक्वांदो या देशातील एकमेव अधिकृत राष्ट्रीय संघटनेच्या वतीने उत्तराखंड येथे 29 मे ते 1 जून दरम्यान राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा पार पडली. यामध्ये विराजने प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक पटकाविले. विराज केडगाव येथील एकलव्य तायक्वांदो अकॅडमीत मुख्य प्रशिक्षक गणेश वंजारे, योगेश बिचीतकर, सचिन मरकड, मंगेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. अहिल्यानगर बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष ॲड. गजेंद्र पिसाळ व शिक्षिका स्मिता पिसाळ यांचा तो मुलगा असून, अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ यांचा नातू आहे.
या यशाबद्दल ग्रँड मास्टर अल्ताफ खान, एकलव्य तायक्वांदो अकॅडमीचे अध्यक्ष दिलीप सातपुते, तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे सचिव घनश्‍याम सानप यांनी त्याचे अभिनंदन केले. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष संदीप ओंबासे, महासचिव गफ्फार पठाण यांनी विराजला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS