Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खांबा गावच्या उपसा सिंचन योजनेसाठी जॅकवेल पंप हाऊस मंजूर ; जलसंपदा मंत्री विखेचा महत्वपूर्ण निर्णय

।संगमनेर : तालुक्यातील खांबे येथील कामधेनू सहकारी उपसा सिंचन योजनेसाठी आ.अमोल खताळ यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून, जॅकवेल घेण्यास जलसंपदा

इंदोरी फाटा बनले अवैध दारू विक्रीचे केंद्र
कोपरगावात अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा; तिघे ताब्यात, १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
शहरातील मध्यवर्ती भागात मद्य परवाना देवू नका
Displaying PHOTO-2025-06-01-17-00-35.jpg

।संगमनेर : तालुक्यातील खांबे येथील कामधेनू सहकारी उपसा सिंचन योजनेसाठी आ.अमोल खताळ यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून, जॅकवेल घेण्यास जलसंपदा विभागाने मंजुरी दिल्याचे पत्र जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वता येवून ग्रामस्थाकडे सुपूर्द केले. जलसंपदाच्या निर्णायमुळे खांबा गावाच्या पाणी प्रश्नातील मोठा अडथळा दूर झाला आहे.
जलसंपदा विभागाने सादर झालेल्या प्रस्तावला शर्थी आणि अटी टाकून म्हैसगाव तास या पुलापासून मुळा धरणाच्या बुडीत क्षेत्रात साधारणपणे ५०ते ७५ मीटर  अंतरावर मुळा धरणाच्या भीतींपासून २२ कि.मी.अंतरावर तीन गुंठे जागा जॅकवेल अप्रोच ब्रीज  व पंप हाऊसचे काम करण्यासाठी जलसंधारण विभागास ना हरकत पत्र दिल्याने गावासाठी स्वतंत्र जॅकवेल घेण्याची मोठी
अडचण दूर झाली आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागाला पाणी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते त्याची सुरूवात झाली आहे. अजून या प्रश्नावर खूप काम करायचे असून जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या सहकार्याने दिलेल्या आश्वासनाची नक्की पूर्तता होईल, आशी प्रतिक्रीया आ.अमोल खताळ यांनी व्यक्त केले. सरपंच रविंद्र दातीर यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आ.अमोल खताळ यांच्या सहकार्याने खांबे गावाला मोठा दिलासा मिळाला असून लवकर जॅकवेल आणि पंप हाऊसचे काम करून गावासाठी पाणी आणण्याचे स्वप्न पूर्ण करणार असल्याची भावना व्यक्त केली.

COMMENTS