Homeताज्या बातम्या

“अवैध दारू व गुटखा विक्री रोखण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घ्यावा” – हेरंब कुलकर्णी यांचे आवाहन; आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या भूमिकेचे स्वागत

अकोले : अकोले तालुक्यात अवैध दारू आणि गुटखा विक्री रोखण्यासाठी गावकऱ्यांनी अधिक आक्रमक भूमिका घेण्याची गरज असून, गावात येणाऱ्या बेकायदेशीर मालाच्

‘महा ऑनलाइन’ यंत्रणेत तांत्रिक बिघाड; अकोले तालुक्यात विद्यार्थ्यांचे हाल, ऑफलाइन दाखल्यांना मान्यता देण्याची जिल्हा ग्राहक पंचायतीची मागणी
 कर्जमाफीच्या निषेधार्थ किसान सभेचे राज्यभर आंदोलनआज कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांना निवेदन देणार  
कर्जमाफीच्या अटी शेतकऱ्यांसाठी जाचक; डॉ. अजित नवले यांचा सरकारवर आरोप
Heramb Kulkarni : माझे सांडलेले रक्त कारणी लागले : हेरंब कुलकर्णी | I Love  Nagar | News Portal

अकोले : अकोले तालुक्यात अवैध दारू आणि गुटखा विक्री रोखण्यासाठी गावकऱ्यांनी अधिक आक्रमक भूमिका घेण्याची गरज असून, गावात येणाऱ्या बेकायदेशीर मालाच्या वाहतुकीवर कडक लक्ष ठेवावे, असे आवाहन अकोले तालुका दारूबंदी आंदोलनाचे प्रमुख हेरंब कुलकर्णी यांनी केले आहे.

आमदार डॉ. किरण लहामटे यांनी तालुक्यातील अवैध दारूविक्रीविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेचे स्वागत करत कुलकर्णी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दारू आणि गुटखा बाहेरूनच गावात येतो. त्यामुळे गावकऱ्यांनी, विशेषतः युवक व महिलांनी, संशयास्पद वाहनांवर आणि वाहतुकीवर लक्ष ठेवून प्रशासनाला तात्काळ माहिती द्यावी. तसेच अवैध व्यवसाय करणाऱ्यांना ग्रामपंचायत, सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत सामूहिक समज देण्याची आवश्यकता आहे.

गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि पोलीस पाटील यांनी केवळ दारूच नव्हे, तर गुटखा, मटका आणि बालविवाह यांसारख्या सामाजिक विकृतींविरोधात ठाम भूमिका घेतली पाहिजे, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले. गाव एकत्र आल्यास अशा गैरप्रकारांना आळा घालणे सहज शक्य आहे. ज्या ठिकाणी पोलीस किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दुर्लक्ष होत असेल, तेथील संबंधित अधिकाऱ्यांवर थेट कारवाईची मागणी गावकऱ्यांनी करावी, असे आवाहन करत दारूबंदी चळवळ नेहमीच गावकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, असा विश्वास हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

COMMENTS