Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संपूर्ण जामखेडमध्ये एकही पाणपोई नाही..!

बाटलीबंदच्या काळात माणुसकी आटू नये!

जामखेड ः फिल्टर जार, बाटलीबंद पाण्याच्या काळात पाणपोई कालबाह्य झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. जामखेड शहर व परिसरात सध्या एकही पाणपोई बघायला मिळ

शेतकर्यांचा कृषि माल निर्यातीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ प्रयत्नशील- कुलगुरु डॉ.पाटील
Ahmednagar :वाराईचा प्रशन बिकट…व्यापारी गेले जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारी
डॉ. सुभजीत मुखर्जी यांना शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे स्मृती पुरस्कार

जामखेड ः फिल्टर जार, बाटलीबंद पाण्याच्या काळात पाणपोई कालबाह्य झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. जामखेड शहर व परिसरात सध्या एकही पाणपोई बघायला मिळत नाही. माणुसकी धर्म मोठा समजुन उन्हाळ्याची चाहूल लागताच गाव, खेडे, शहर, चौकाचौकात गर्दीच्या ठिकाणी जागोजागी उभारलेल्या पाणपोई येणार्‍या जाणारया नागरिकांची तहान भागवायचं काम करायच्या. अलीकडच्या काळात मात्र पाणपोई सुरु करण्याकडे लोकांना व सामाजिक कार्यकर्त्यांना विसर पडल्याचे दिसत आहे. जामखेड येथे मोठी बाजारपेठ आहे.जामखेड तालुक्यातील गावांसह परीसरातील आष्टी, पाटोदा, करमाळा तालुक्यातील नागरिकांची नोकरी, शिक्षण, व्यवसाय आदी बाबींसाठी मोठी वर्दळ राहते.
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने जीवाची लाहीलाही होत आहे. अशा परिस्थितीत तहान भागविण्यासाठी वाटसरू लोक पाणी कुठे मिळते का, पाणपोई कुठे दिसते का याचा शोध घेतात.रस्त्यावरील हाँटेलवाले विकत घेतलेले जारचे पाणी काही घेतल्याशिवाय देतांना खाली वर बघतात. नाईलाजाने पाण्याची बंद बाटली विकत घ्यावी लागते. कोणाचे ऐपत असते कोणाची नसते. पूर्वी सामाजिक संस्था, विविध मंडळ किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्मरणार्थ पाणपोई उभारल्या जायच्या. दोन तीन रांजणे, त्याला अडकलेले ग्लास अशी व्यवस्था असायची. रखरखत्या उन्हातून आलेल्या नागरिकांची तहान पाणपोईच्या माध्यमातून भागवली जायची. मात्र अलीकडच्या काळात जामखेडला पाणपोईच नामशेष झाल्याचे दिसत आहे. सामाजिक दायित्व निभावण्याच्या दृष्टीकोनातून तसेच पुण्यकर्म म्हणून पुन्हा एकदा अशा पाणपोई सार्वजनिक ठिकाणांवर सुरु करण्याची आवश्यकता आहे.पाणी  कमी जास्त होईल हे नैसर्गिक आहे मात्र बाटलीबंद पाण्याच्या नावाखाली माणुसकी आटु नये एवढीच अपेक्षा आहे.

COMMENTS