भाजपचा महाविकास आघाडीला पुन्हा दे धक्का

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपचा महाविकास आघाडीला पुन्हा दे धक्का

काँगे्रसमध्ये मोठी फूट; चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव

मुंबई : अतिशय चुरशीच्या झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपने आपले पाचही उमेदवार निवडून आणत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. काँगे्रसचे उमेदवार चंद्र

तैवानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप
उध्दव महाराजांनी वडुलेचे नाव राज्यात पोहचवले
चकलांब्यात विजेचा लपंडाव; पुरवठा सुरळीतपणे करण्याची मागणी

मुंबई : अतिशय चुरशीच्या झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपने आपले पाचही उमेदवार निवडून आणत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. काँगे्रसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे पराभूत झाल्यामुळे आघाडीच्या गोटात चिंता पसरली आहे. काँगे्रसची मते फुटल्यामुळे त्याचा मोठा फटका काँग्रसला बसला. यात राष्ट्रवादी काँगे्रसचे रामराजे निंबाळकर, आणि एकनाथ खडसे विजयी झाले आहेत. शिवसेनेचे सचिन अहिर, आमशा पडवी दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत, तर भाजपचे प्रा. राम शिंदे, प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय आणि प्रवीण दरेकर यांचा विजय झाला असून, काँगे्रसचे भाई जगताप देखील विजयी झाले आहेत.
10 जागांसाठी 11 उमेदवार असल्यामुळे विजयापेक्षा पराभव कुणाच्या वाटयाला येणार याचीच उत्सुकता राज्यामध्ये होती. मात्र या पराभवात हंडोरे पराभूत झाले आहेत. विधानपरिषदेच्या दहा जागेसाठी घेण्यात आलेल्या मतदानानंतर निकालाच्या वेळी पुन्हा एकदा राज्यसभेच्या निकालाप्रमाणेच हायहोल्टेज ड्रामा रंगल्याचे पहायला मिळाला. काँगे्रस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपच्या मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर आक्षेप घेतल्यामुळे निवडणूक निकालाला विलंब झाल्याचे पहायला मिळाले.विधान परिषदेच्या दहा जागांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीत एकूण 285 आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. मात्र यामध्ये राष्ट्रवादी काँगे्रसचे उमेदवार रामराजे निंबाळकर यांच्या कोटयातील एक तर भाजपच्या उमा खापरे यांच्या कोटयातील एक मत बाद झाल्यामुळे 283 मतांची मतमोजणी करण्यात आली. यापैकी 133 मते भाजपला मिळाल्यामुळे महाविकास आघाडीचे मते फुटल्याचे समोर आले आहेत. महाविकास आघाडीचे तब्बल 15-18 मते फुटल्यामुळे, ही मते नेमकी कोणत्या पक्षाची आहेत, याचा शोध महाविकास घेईलच, मात्र हा महाविकास आघाडीसाठी मोठा धोक्याचा इशारा असल्याचे दिसून येत आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी गुप्त मतदान पद्धतीमुळे महाविकास आघाडीतील ते आमदार कोण, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पक्षातूनच होईल. मात्र मतमोजणीपूर्वी पुन्हा एकदा राज्यसभेसारखा ड्रामा विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणी अगोदर सुरु झाला होता. भारतीय जनता पार्टीचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. याबाबतची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. दोन तासानंतर निवडणूक आयोगाने काँग्रेसचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यानंतर निवडणूक मतमोजणीला सुरुवात झाली होती. विधान परिषदेच्या दहा जागांसाठी एकूण अकरा उमेदवार रिंगणात उतरले होते.


आघाडीतील धुसफूस पुन्हा समोर
राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्यानंतर शिवसेनेने काँगे्रससोबत असहकार्यांची भूमिका घेतली होती. विधानपरिषदेसाठी प्रत्येक पक्षाने आप-आपले बघून घ्यावे असा सूचक संदेशच शिवसेनेने दिला होता. त्याचा प्रत्यय या निवडणुकीत बघायला
मिळाला. शिवाय काँगे्रसची मोठया प्रमाणावर फूट पडल्यामुळे ही मते भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांच्या पारडयात पडल्याचे दिसून आले. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून आले आहे.

COMMENTS