मुळा 40 टक्के तर भंडारदरा निम्मे भरले ; पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुळा 40 टक्के तर भंडारदरा निम्मे भरले ; पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम

अहमदनगर/प्रतिनिधी- नगर जिल्ह्यातील दोन महत्त्वाची धरणे असलेल्या राहुरी तालुक्यातील मुळा व अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण लाभक्षेत्रातील जनतेला दिलासा

स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्याच्या कामाची सुरुवात करावी – नगरसेवक डॉ.सागर बोरुडे
कोरोना काळात आर्थिक संकट ओढवलेल्या महिलांना शिलाई मशीनचे वाटप
चक्क भिकारी व अल्पवयीन मुलांच्या नावावर लाखोंचे कर्ज…;शेवगाव नगर अर्बन बँक बनावट सोने तारण घोटाळ्याच्या सुरस कथा चर्चेत

अहमदनगर/प्रतिनिधी- नगर जिल्ह्यातील दोन महत्त्वाची धरणे असलेल्या राहुरी तालुक्यातील मुळा व अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण लाभक्षेत्रातील जनतेला दिलासा मिळू लागला आहे. या दोन्ही धरणांपैकी मुळा धरण 40 टक्के भरले असून, भंडारदरा धरणही 50 टक्के भरले आहे. या दोन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरणांतून नव्या पाण्याची आवक सुरू आहे.
उत्तर नगर जिल्ह्याला वरदान असलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात पावसाचा जोर असल्याने नवीन पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा तासागणिक वाढू लागला आहे. मागील 12 तासांत 192 दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाल्याने या धरणातील पाणीसाठा 5275 दलघफू झाला आहे. पावसाचे प्रमाण असे टिकून राहिल्यास या धरणातील पाणीसाठा 11 हजार दशलक्ष घनफुट या क्षमतेचा निम्मा म्हणजे सुमारे साडेपाच हजार दशलक्ष घनफूट होणार आहे.
मध्यंतरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पावसाचा जोर नसल्याने दोन्ही धरणांच्या पाणीसाठ्यात फारशी वाढ झाली नव्हती. पण मागील तीन-चार दिवसांपासून भंडारदरा पाणलोटात पावसाची अखंड धार सुरू आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या या धरणात मंगळवारी सायंकाळी 5275 दलघफू पाणीसाठा होता. 8320 दलघफू क्षमतेच्या निळवंडे धरणातही नवीन पाणी येत असून या धरणातील पाणीसाठा 1500 दलघफू होता. 102 दलघफू क्षमतेचे वाकी तलावातील पाणीसाठा 60 टक्क्यांवर पोहचला आहे. आढळा पाणलोटातही पाऊस सुरू असल्याने या धरणात नवीन पाण्याची आवक होत आहे.

संततधार सुरू
मुळा धरणाच्या पाणलोटात असलेल्या कोतूळ, हरिश्‍चंद्र गड, आंबित, पाचनईत पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे मुळा नदीतील पाणीपातळी 5000 क्युसेकच्या पुढे गेली होती. धरणात पाणी येण्यास उशीर लागत असल्याने सायंकाळी धरणात 2568 क्युसेकने आवक सुरू होती. रात्रीतून ही आवक वाढेल असे सांगण्यात आले. 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणात आता 10401 दलघफू पाणीसाठा आहे.

दक्षिणेतही आशा पल्लवीत
दक्षिण नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर आणि कर्जतला वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पातील पाचही धरणांत पाण्याची आवक वाढली आहे. या प्रकल्पात 899 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. त्यामुळे एकूण उपयुक्त पाणीसाठा 6520 दलघफूवर (22 टक्के) पोहचला आहे. गेल्यावर्षी याचवेळी 20 टक्के पाणीसाठा होता. सर्वात मोठे असलेल्या डिंभे धरणात 492 दलघफू पाणी दाखल झाल्याने साठा 4810 दलघफू (40 टक्के) झाला आहे. येडगाव धरणात 1397, माणिकडोह 2122, वडजमध्ये 593 दलघफू पाणीसाठा आहे. घोड धरणातील पाणीसाठा 1548 दलघफू आहे.

COMMENTS