Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टोप्यांच्या घरात दहा ते पंधरा टक्क्यांची वाढ

लातूर प्रतिनिधी - सध्या कडक कुन्हाळा सुरु झाला असून शहरातील तसेच महाराष्ट्रातही पारा वाढला आहे. अनेकांना कामानिमित्त भर उन्हात बाहेर पडावे लागते

वादळी पावसामुळे आंब्याचे नुकसान
बहुजन समाज पार्टीच्यावतीने इफ्तार पार्टी
अखेर शितल गादेकर प्रकरणी ॲड. नरेश मुनोत यांच्या विरोधात गुन्हा दाखल

लातूर प्रतिनिधी – सध्या कडक कुन्हाळा सुरु झाला असून शहरातील तसेच महाराष्ट्रातही पारा वाढला आहे. अनेकांना कामानिमित्त भर उन्हात बाहेर पडावे लागते. त्यामुळे कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी टोप्यांची व गमजांची खरेदी करताना नागरिक दिसत आहे. शहरातील गांधी चौक जुने रेल्वे स्टेशन समोर काही टोप्यांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. तसेच तप्त उन्हामध्ये आपल्या शरीराला शितलता मिळावी यासाठी टोप्यांचे व गमजांचे या स्टॉलवरुन मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. यंदा टोप्यांच्या किंमतीत दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे.
सध्या मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून उन्हांचा तडाका वाढला आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक हे आपले कामे सकाळच्या सत्रातच करून घेत आहेत. तथापि अनेकदा भर दुपारी उन्हाचा तडाका सहन करत घराबाहेर पडावे लागते यामुळे टोप्यांची व गमज्यांची मागणी वाढली आहे. ह्या सर्व टोप्या व ग्मजे मुंबई व काही शहरातील लोकल मार्केट मधून मागवले जातात यामध्ये लहान मुलांची टोपी 50 ते 70 रुपये तर फॅन्सी लेडीज टोपी 50 ते 130 रुपये व रेगुलर टोप्या या 50 ते 250रुपये तसेच गमचे 70 ते 80 रुपयापर्यंत या स्टॉलवर विकले जात आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा टोप्यांच्या दरात 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली असून तसेच लहान मुलासोबतच महिला, पुरुष, युवक देखील या टोप्या कडक उन्हापासून संरक्षण मिळवण्यासाठी घालत आहेत. अशी माहिती टोप्या विक्रेते काझी इब्राहिम दस्तगीर सय्यद यांनी दिली आहे.

COMMENTS