Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावच्या साई सालकरची उत्तुंग भरारी

जर्मनीच्या स्टुटगार्ट विद्यापीठाची एमएससी पदवी

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगावच्या साईप्रसाद राजेंद्र सालकर याने जर्मनीच्या  स्टुटगार्ट विद्यापीठाकडून  इन्फोटेक (एम्बेडेड सिस्टम्स) एम एस: एम.एस्सी

माहेरच्या साडीने भगिनी गहिवरल्या
दौड यांच्या भूमिकेनंतर पाथर्डी तालुक्याचे राजकारण तापले
कुदळे दाम्पत्यास शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे जीवनगौरव पुरस्कार

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगावच्या साईप्रसाद राजेंद्र सालकर याने जर्मनीच्या  स्टुटगार्ट विद्यापीठाकडून  इन्फोटेक (एम्बेडेड सिस्टम्स) एम एस: एम.एस्सी. पदवी प्राप्त केली आहे. स्टुटगार्ट विद्यापीठ, जर्मनी येथे त्याचे संशोधन प्रबंध  सादर केले होते. त्यात स्टुटगार्ट, जर्मनी या विद्यापीठाची एम.एससी. पदवी मिळून त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
साईप्रसाद सालकर यांनी शारदा इंग्लिश स्कूलमधून दहावी पास केल्यानंतर संजीवनी येथील के.बी.पी. पॉलिटेक्निकमध्ये ई.एन.टी.सी या शाखेतून डिप्लोमा केला. चांगले मार्क मिळवून पुणे येथील पीआयसीटी कॉलेजमध्ये डिग्रीसाठी प्रवेश मिळवला. त्या कॉलेजमध्ये पहिल्या पाचमध्ये येण्याचा मान मिळून एनटीसी शाखेची डिग्री प्राप्त केली. त्यानंतर अमेरिका किंवा जर्मनीमध्ये जाऊन इ एनटीसीमध्ये एमएससी करण्याचे त्याची स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी युनिव्हर्सिटीकडे प्रयत्न केले. परंतु आधी त्याला टीसीएस पुणे या कंपनीत त्याला नोकरी मिळाली. पुणे येथे एक दीड दोन वर्षे काम केल्यानंतर कंपनीने त्याला जर्मनी येथे पाठवले तेथे दीड वर्ष सर्विस करीत असताना प्रमोशन झाले चांगला पगार मिळू लागला परंतु एम एस सी करण्याचे त्याचे स्वप्न अपूर्ण राहते की काय याची सल मात्र त्याच्या मनात कायम होती याच काळात जर्मनी येथील नामांकित स्टुटगार्ट युनिव्हर्सिटी मध्ये एमएससीसाठी त्याचा नंबर लागला त्याला आनंद झाला मोठ्या धाडसाने त्याने जपान मधील टीसीएसची चांगल्या पगाराची नोकरी सोडून एम एस साठी जर्मनीच्या स्टुटगार्टविद्यापीठात , प्रवेश घेतला शिक्षणाचा लाख रुपयांच्या खर्च भागविण्यासाठी त्यांनी शिकण्याबरोबरच पार्ट टाइम नोकरी सुद्धा केली व मोठ्या चिकाटीने अभ्यास करून त्याने एम एस पूर्ण करून स्वप्न साकार केले एम एस सी चे स्वप्न पूर्ण करीत असतानाच जर्मन मधील ऑटोमोबाईल क्षेत्रातील एका नामांकित कंपनीत  तो नोकरी करीत आहे. जर्मनी येथे गुरुवारी (दि 11मे) रोजी  स्टुटगार्ट युनिव्हर्सिटी मध्ये पदवीदान समारंभ झाला जर्मनी मधील फाइव स्टार हॉटेलमधील भव्य दिव्य समारंभात  पहिल्या पाच मध्ये येण्याचा मान मिळवून इन्फोटेक स्टडीजचे डीन आणि इन्स्टिट्यूट ऑफ टेलिकम्युनिकेशन्स आणि इन्स्टिट्यूट फॉर इन्फॉर्मेशन ट्रान्समिशनचे प्रमुख, स्टुटगार्ट विद्यापीठ, जर्मनी अर्ड वॉर्डे: प्राध्यापक. डॉ.-आयएनजी स्टीफन टेन ब्रिंक यांचे हस्ते पदवी स्विकारली. सालकर  कुटुंबातील परदेशात उच्च  पदवी घेणारा तो पहिला  ठरला याचा मला निश्‍चितच अभिमान आहे.

COMMENTS