Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाडा हॉटेलपासून पीव्हीआर चित्रपट गृहापर्यंत वळण रस्त्यावरील स्ट्रीट लाईटची तातडीने दुरुस्ती

लातूर प्रतिनिधी - माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सूचना दिल्यानंतर औसा रोडवरील वाडा हॉटेलपासून बार्शी रोडवरील पीव्हीआर चित्रपट गृहाप

मराठा आरक्षणासाठी एकाची आत्महत्या
विधान परिषदेच्या रणांगणात ‘टोकन’ची चर्चा; 452 मतदारांभोवती फिरतेय कोट्यवधींची राजकीय गणिते!निवडणूक प्रचारापेक्षा ‘मतदार व्यवस्थापन’च अधिक चर्चेत; सहली, रिसॉर्ट्स आणि आमिषांच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामकाल पथाचे भूमिपूजन

लातूर प्रतिनिधी – माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सूचना दिल्यानंतर औसा रोडवरील वाडा हॉटेलपासून बार्शी रोडवरील पीव्हीआर चित्रपट गृहापर्यंतच्या वळण रस्त्यावरील स्ट्रीट लाईट तातडीने दुरुस्त करुन चालू करण्यात आले आहेत. या संदर्भातील अधिक माहिती अशी की, रविवार दि. 23 एप्रिल रोजी सायंकाळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख लातूरहून चिकुर्डा येथे कार्यक्रमसाठी जात असताना वाडा हॉटेलपासून पीव्हीआर चित्रपटगृह, बार्शी रोडपर्यंत वळण रस्त्यावरील स्ट्रीट लाईट बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या संदर्भाने त्यानि राष्ट्रीय महामार्ग अधिका-यांशी संपर्क करुन स्ट्रीट लाईट बंद असल्याच्या कारणाबाबत विचारणा केली तसेच माहिती घेतली आणि आवश्यक त्या दुरुस्त्या करुन सदरची स्ट्रीट लाईट तातडीने सुरु करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिका-यांना यावेळी केल्या होत्या.
राष्ट्रीय महामार्ग अधिका-यांनी या सूचनांची दखल घेत तातडीने दुरुस्तीची कार्यवाही केली असून एकाच दिवसात वाडा हॉटेलपासून पीव्हीआर चित्रपट गृहापर्यंत संपूर्ण स्ट्रीट लाईट सुरु करण्यात आली आहे. सूचना मिळाल्यानंतर तातडीने कार्यवाही केल्याबद्दल आमदार अमित देशमुख यांनी संबंधित अधिका-यांचे कौतुक करुन आभार मानले आहेत. या रस्त्यावरुन प्रवास करणारे प्रवासी तसेच जवळपासच्या परिसरात राहणा-या स्थानिक नागरिकांनी स्ट्रीट लाईट चालू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

COMMENTS