Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वसंतदादा पाटील महाविद्यालयाचा अनिल खेडकर करणार युवा संसदेत बीड जिल्ह्याचे नेतृत्व

पाटोदा प्रतिनिधी - राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि युनिसेफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथे द

वसंतदादा पाटील महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर वेबिनार संपन्न
वसंतदादा पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
वसंतदादा पाटील महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

पाटोदा प्रतिनिधी – राष्ट्रीय सेवा योजना, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि युनिसेफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथे दि. 18 व 19 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या राज्यस्तरीय युवा संसद कार्यक्रमात बीड जिल्ह्याचे नेतृत्व येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी अनिल खेडकर करणार आहे.
पाच लाख जनतेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी राज्यातून 78 जणांची निवड करण्यात आली आहे. त्यात बीड जिल्ह्यातून अनिल खेडकर याची निवड झाली आहे, ही बाब बीडकरांसाठी अभिमानास्पद आहे. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व, वाद-विवाद तसेच काव्यवाचन स्पर्धांमधून अनिलने यश संपादन केले आहे. तो जिल्ह्यातील शिरूर कासार  तालुक्यातील बावी येथील रहिवासी असून प्रचंड प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत व संघर्ष करत मनात जिद्द बाळगून त्याने ही उंच भरारी घेतली आहे. वसंतदादा पाटील महाविद्यालयात बीसीएस प्रथम वर्षात शिकत असलेल्या अनिलची निवड डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामार्फत झाली आहे. अनिलच्या या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे यांच्या हस्ते त्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पदव्युत्तर विभाग संचालक डॉ. मनोजकुमार प्रकाश, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. यादव घोडके, प्रोफेसर प्रशांत पाटील, प्रा. मनिषा गाढवे उपस्थित होते. त्याच्या या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील नागरिक अनिलचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहेत.  

COMMENTS