Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जगदगुरू बाबाजींच्या परंपरा प्रत्येकासाठी  लाभदायी  उत्तराधिकारी श्रीसंत सदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराजांचे प्रतिपादन 

नाशिक प्रतिनिधी - निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी महाराजांनी भाविकांच्या  कल्याणासाठी विविध परंपरा सुरू केल्या. बाबाजींनी सुरू केलेल्या य

राज्यात उद्यापासून जोरदार पाऊस
अन्यथा, नव्वदीच्या दशकाप्रमाणे सत्ताकारण अस्थिर होईल !
मुंबईत 25 वर्षीय एअर होस्टेसची निर्घृण हत्या

नाशिक प्रतिनिधी – निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी महाराजांनी भाविकांच्या  कल्याणासाठी विविध परंपरा सुरू केल्या. बाबाजींनी सुरू केलेल्या या परंपरा समजासाठी सर्वांगाने लाभदायक आहेत.भविकांनी सदगुरूंच्या आज्ञेचे पालन करावे, रोज  विधी ग्रंथ व भागवत वाचावे वार्षिक जपानुष्ठान करावे, श्रमदान करावे,गोसेवा,कृषी-ऋषी सेवा करावी   यातूनच आपली खऱ्या अर्थाने आध्यात्मिक प्रगती आणि आर्थिक समृद्धी होऊ शकेल असे प्रतिपादन निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे पीठाधीश्वर उत्तराधिकारी अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्वर श्रीसंत सदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी केले.

          जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने जगदगुरू जनार्दन स्वामी महाराज यांच्या ३४ व्या पुण्यस्मरणनिमित्त  श्रीक्षेत्र नाशिक येथील तापोवनात जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.या सोहळ्यात रोज पहाटे  नित्य नियम विधी,ध्यान,प्राणायाम,भागवत वाचन,प्रवचन,सत्संग,यांसह जपानुष्ठान,महायज्ञ,हस्तलिखित नामजप साधना,अखंड नंदादीप,नामसंकीर्तन,भागवत पारायण, श्रमदान यांसह भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन  करण्यात आले. यावेळी भाविकांना मार्गदर्शन करतांना अनंत विभूषित सदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज बोलत होते.ते पुढे म्हणाले की भारतीय संस्कृतीत गुरू-शिष्याचे अतूट नाते आहे.जीवनातील अंधकार दूर करायचा असेल तर सदगुरूंना शरण येऊन त्यांच्या आज्ञेचे पालन करावे.सदगुरू नामात मोठे सामर्थ्य आहे .ज्यांच्या मुखात सदगुरूंचे नामस्मरण असेल त्यांना प्रत्यक्ष काळही काही करू शकणार नाही.मात्र आवडीने भावाने नाम घ्यावे. सतत कामात आणि नामस्मरणात रहा,व्यसनापासून दूर रहा, बाबाजींनी सुरू केलेल्या सर्व परंपरा समाजासाठी सर्वांगाने लाभदायक आहेत.वार्षिक जपानुष्ठान करा,श्रमदान करा,रोज नित्यनियम विधी व भागवत वाचा, कुठेलेही कर्म करतांना चांगले करा,सदगुरू कार्यात व्यस्त रहा

असेही उत्तराधिकारी श्रीसंत सदगुरू स्वामी  शांतिगिरीजी महाराज यांनी सांगितले. याप्रसंगी अतिथी,संत,ब्रम्हवृंद यांचेही पूजन करण्यात आले.यावेळी  उत्तराधिकारी अनंत विभूषित श्री श्री १००८  महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराजांच्या दर्शनासाठी भविकांची रोज मोठी गर्दी होत असून येथे रोज हजारो भाविक अखंड महाप्रसादाचा लाभ घेत आहेत.

COMMENTS