Homeताज्या बातम्या

सरकारच्या लेखी आश्‍वासनानंतरसोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण समाप्त

नवी दिल्ली : ‘नीट’ परीक्षेतील प्रश्‍नपत्रिका फुटीच्या प्रकरणासह देशातील परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू केलेल

दडपशाहीचा मार्ग अयोग्य !
व्यक्तीच्या उपोषणापासून राष्ट्रीय जनआक्रोशापर्यंत !
मान्यमारमधील सायबर गुन्हेगारीच्या विळख्यात अडकले महाराष्ट्रातील तरूणखा.बजरंग सोनवणे यांचे केंद्र व राज्य सरकारला तातडीने हस्तक्षेप करण्याचे पत्र


नवी दिल्ली : ‘नीट’ परीक्षेतील प्रश्‍नपत्रिका फुटीच्या प्रकरणासह देशातील परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी सुरू केलेले 26 दिवसांचे उपोषण सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सरकारकडून लेखी आश्‍वासन मिळाल्यानंतर गुरूवारी मध्यरात्रीनंतर मागे घेतले. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी समाजमाध्यमावरील दृक्संदेशातून दिली.
देशभरात विद्यार्थी आणि युवकांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने या प्रश्‍नाची दखल घेत विविध पातळ्यांवर चर्चा सुरू केली होती. त्यानंतर गुरुवारी उशिरा सरकारच्या प्रतिनिधींनी सोनम वांगचुक यांची भेट घेतली. त्यानंतर उपोषणाच्या 26 व्या दिवशी मध्यरात्रीनंतर त्यांनी उपोषण सोडण्याची घोषणा केली. सोनम वांगचुक यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांपासून सरकारशी सातत्याने चर्चा सुरू होती. मागण्यांबाबत तोंडी नव्हे तर लेखी हमी मिळावी, अशी त्यांची भूमिका होती. सरकारने लेखी आश्‍वासन दिल्यानंतरच उपोषण समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी विविध राजकीय पक्षांतील सुमारे 65 खासदारांनी संयुक्तपणे पत्र देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांवर संसदेत चर्चा होईल, असेही आश्‍वासन देण्यात आले होते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत मात्र कोणतेही ठोस आश्‍वासन मिळाले नसल्याचे सोनम वांगचुक यांनी स्पष्ट केले. या विषयावर सरकारने सकारात्मक भूमिका घेतलेली नसली, तरी इतर महत्त्वाच्या मागण्यांबाबत लेखी हमी मिळाल्याने उपोषण समाप्त करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, उपोषण पुढे सुरू ठेवून स्वतःच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण करण्यापेक्षा चळवळ जिवंत ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. गेल्या काही आठवड्यांत अनेकांनी हा लढा पुढे नेण्यासाठी त्यांचे जिवंत राहणे आवश्यक असल्याचे सांगितल्याने त्यांनी त्याचाही विचार केला. विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हे दाखल होऊ नयेत, हीच आपल्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची बाब असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. एका गुन्ह्याची नोंदही विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर दीर्घकालीन परिणाम करू शकते, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. उपोषणाची सांगता करताना सोनम वांगचुक यांनी आंदोलनाला पाठिंबा देणार्‍या देशभरातील विद्यार्थी, युवक, सामाजिक संस्था आणि नागरिकांचे आभार मानले. सरकारने दिलेल्या लेखी आश्‍वासनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
लेखी आश्‍वासनात काय ?
सरकारने दिलेल्या लेखी आश्‍वासनानुसार, जंतर-मंतर येथे शांततेत आंदोलन करणार्‍या तसेच 20 जुलै रोजी आयोजित ‘संसद चलो’ मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थी आणि युवकांविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई किंवा गुन्हे नोंदविण्यात येणार नाहीत. प्रश्‍नपत्रिका फुटीच्या प्रकरणामुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना योग्य आर्थिक मदत देण्याचा विचार केला जाईल. तसेच परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी, सुधारणा आणि शिक्षण क्षेत्रातील उत्तरदायित्व या विषयांवर संसदेत सविस्तर चर्चा केली जाईल, असेही सरकारने नमूद केले आहे.

COMMENTS