Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मविआत जागावाटपावरून वाढला तणाव

सांगली, भिवंडीच्या जागेवरून वादंग

मुंबई ः लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीचा वारू उधळतांना दिसून येत असला तरी, महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून नाराजीनाट्य सुरूच असल्याचे दिसून येत आहे

४७ वर्षीय महिलेने १८ व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन
मानसिक आजारातून मुक्त मातेस 6 वर्षांनी आठवली मुलगी अन् घर
हार्दिक-अक्षयाची थाटामाटात साजरी झाली पहिली मंगळागौर

मुंबई ः लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीचा वारू उधळतांना दिसून येत असला तरी, महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून नाराजीनाट्य सुरूच असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि काँगे्रसमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसून येत आहे. निमित्त ठरतांना दिसून येत आहे, सांगली लोकसभा निवडणूक. सांगली जागा काँगे्रसने प्रतिष्ठेची केली असून, ती जागा परत मिळवण्यासाठी काँगे्रसचे शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. तर काँगे्रस हायकमांड यांनी हात वरती करत राज्यातच समन्वयाने हा प्रश्‍न मिटवण्याचे सांगितले आहे.
सांगलीप्रमाणे भिवंडीवरही काँग्रेसने बैठकीत दावा केला होता. पण त्याकडे दुर्लक्ष करत सांगलीमध्ये उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना तर भिवंडीत शरद पवारांनी म्हात्रेंना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे दोन्ही जागांवरून काँगे्रस आणि ठाकरे गटामध्ये तणाव बघायला मिळत आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या सहापैकी चार जागेवर शिवसेना आणि दोन जागेवर काँग्रेस उमेदवार देणार असे ठरले होते. मात्र, अद्यापही काँग्रेसकडून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आपला उमेदवार उतरवणार असल्याची चर्चा आहे. शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी आपला प्रचार देखील सुरू केल्याची माहिती आहे. उत्तर मुंबईसाठी काँग्रेसकडे उमेदवार इच्छुक नसल्यामुळे या ठिकाणी शिवसेना ठाकरे गट आपला उमेदवार उतरवणार असल्याचे समजते शिवसेना ठाकरे गटाकडून शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांनी आपला प्रचार देखील सुरू केला आहे. एकीकडे मुंबईच्या चार जागांवर शिवसेना ठाकरे गटाकडून यापूर्वीच चार उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे, मात्र काँग्रेसने अद्यापही आपले मुंबईतील उमेदवार जाहीर केले नसल्यामुळे उत्तर मुंबई जागेवर घोसाळकर यांना उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर येणार्‍या विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मतदारसंघातील पक्षाचे मतदान नेमके किती आहे याची चाचणी या माध्यमातून केली जाण्याची शक्यता आहे.

चंद्रहार पाटील हेच उमेदवार असतील ः संजय राऊत – सांगली लोकसभा मतदारसंघात चंद्रहार पाटील हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, याबाबत दोनच दिवसात काँग्रेसच्या हायकमांडकडून सुद्धा तशी घोषणा केली जाईल. विश्‍वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्यासहित काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सर्व नेते आणि कार्यकर्ते चंद्रहार पाटील यांचाच प्रचार करतील, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली. सांगलीमध्ये संजय राऊत रविवारी माध्यमांशी बोलत होते. मैत्रीपूर्ण लढत हा घातक शब्द आहे, एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करण्याचा प्रयत्न झाला तर संपूर्ण महाराष्ट्रात तशाच प्रकारच्या मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात, असे सांगून संजय राऊत पुढे म्हणाले, माझ्या दृष्टिकोनातून सांगलीतील संपूर्ण वाद मिटलेला आहे.

COMMENTS