युक्रेन-रशिया युद्धाचा भडका

Homeताज्या बातम्यादेश

युक्रेन-रशिया युद्धाचा भडका

रशियाची सहा विमाने आणि एक हेलिकॉप्टर पाडले ; 50 रशियन घुसखोरांचा खात्मा ' युक्रेनचा दावा

कीव/वृत्तसंस्था : रशियाने युक्रेनमध्ये गुरूवारी सकाळपासून हल्ले करण्यास सुरूवात केल्यामुळे युद्धाचा भडका उडाल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे रशियाच्

केजरीवालांचा पाय खोलात
हिस्से वाटणीच्या कारणातून साडूची केली हत्या.
Mumbai : कपड्याच्या गोदामाला भीषण आग | LOKNews24

कीव/वृत्तसंस्था : रशियाने युक्रेनमध्ये गुरूवारी सकाळपासून हल्ले करण्यास सुरूवात केल्यामुळे युद्धाचा भडका उडाल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे रशियाच्या हल्ल्याचा कडवा प्रतिकार युक्रेन करतांना दिसून येत आहे. युक्रेन आणि रशियामधील युद्ध टाळले जाऊ शकत नाही असे पुतिन म्हणाले आहेत.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर युक्रेननेही रशियाला जशाच तसे उत्तर दिल्याचा दावा केलाय. रशियाची सहा विमाने आणि एक हेलिकॉप्टर आम्ही पाडल्याचा दावा युक्रेनने केला. 50 रशियन घुसखोरांचा खात्मा केल्याचा दावा केला आहे. तर रशियन हल्ल्यात 7 युक्रेन नागरिक ठार झाल्याचे समोर आले आहे. लुहान्स्क हा युक्रेनमधील बंडखोर प्रांतांपैकी एक आहे. याच आठवड्यामध्येच रशियाने लुहान्स्कला वेगळा देश म्हणून घोषित केले आहे. रशियन लष्कराने युक्रेनकडून करण्यात आलेला हवाई हल्ला आम्ही हाणून पाडल्याचा दावा केलाय. युक्रेनच्या उत्तरेकडून रशियाने हल्ला केला असून रशियन सैन्य युक्रेनच्या भूप्रदेशात शिरले आहे. त्याचबरोबरच ब्रुसेल्समधूनही रशियाने युक्रेनवर हल्ला चढवला. मात्र या हल्ल्याला युक्रेनकडूनही जोरदार उत्तर दिले जात आहे.
पुतिन यांनी रशिया विशेष लष्करी ऑपरेशनला सुरुवात करणार सांगतांना या लष्करी कारवाईमधून युक्रेनचे असैनिकीकरण करण्याचा प्रयत्न असेल असेही सांगितले. यावेळी त्यांनी युक्रेनच्या लष्कराला शस्त्र खाली ठेवा आणि आपल्या घऱी निघून जा असेही सांगितले. इतकंच नाही तर अमेरिकेसह इतर युरोपला मधे पडल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला. दरम्यान अमेरिकेने रशियाच्या निर्णयाचा विरोध केला असून गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला असून आणखी निर्बंध लावले जातील असं स्पष्ट केलं आहे. तर संयुक्त राष्ट्राने रशियाला शांतता ठेवण्यासाठी आवाहन केलं आहे. दुसरीकडे भारतानेही भारताने रशिया आणि युक्रेनमधील तणाव कमी करण्यासाठी आवाहन केलं असून मोठं संकट निर्माण होऊ शकतं असा इशारा दिला आहे.

रशियाने नाझी जर्मनीप्रमाणे हल्ला केला : झेलेन्स्की
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाने नाझी जर्मनीप्रमाणे हल्ला केल्याचे म्हटले असून काही झाले तर आपले स्वातंत्र्य हिरावू देणार नसल्याचे सांगितले आहे. रशियाने विश्‍वासघातकीपणे सकाळी हल्ला केला, ज्याप्रमाणे नाझी जर्मनीप्रमाणे दुसर्‍या महायुद्धात केला होता. सध्याच्या घडीला आपले देश जागतिक इतिहासाच्या वेगवेगळ्या दिशेला आहेत. रशियाने दृष्ट मार्गाची निवड केली असताना युक्रेन आपले रक्षण करत असून मॉस्कोला काही वाटत असले तरी आपले स्वातंत्र्य देणार नाही, असे ते म्हणाले आहेत.

युक्रेनमध्ये 18 हजार भारतीय अडकले
रशियाने युक्रेनमधील काही शहरांवर क्षेपणास्त्रे हल्ले केले. युक्रेनमध्ये धुराचे लोट पाहून ज्यांची मुले -मुली युक्रेनमध्ये अडकली आहेत. त्या भारतीय कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अधिक मिळालेल्या माहितीनुसार, अद्यापही 18 हजार भारतीय युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. दरम्यान, 72 तासांपूर्वी युक्रेनमधून भारतीयांना एअरलिफ्ट करण्यासाठी ऑपरेशन सुरू केले होते. परंतु हल्ले सुरू झाल्यानंतर ते थांबविण्यात आले आहे. युक्रेनमध्ये गेलेले एअर इंडियाचे विमान भारतात परत आल्याचे वृत्त सकाळी आले आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय भारतात कसे येणार? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

COMMENTS