गाळप, साखर उत्पादनात सोलापूर दुसऱ्या स्थानी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गाळप, साखर उत्पादनात सोलापूर दुसऱ्या स्थानी

सोलापूर - राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन दोन महिने होत अाले असून अवेळी झालेल्या पावसामुळे गाळपाची गती कमी झाली होती. आतापर्यंत राज्यात दोन कोटी ८९ ला

रशियाच्या ऑलिम्पिकमधील सहभागावर या देशांंचा आक्षेप
समृद्धीवर लवकरच ट्रॅफिक मॅनजमेंट सिस्टीम
बापानेच लेकाला पोत्यात बांधून फेकले नदीत | LOKNews24

सोलापूर – राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन दोन महिने होत अाले असून अवेळी झालेल्या पावसामुळे गाळपाची गती कमी झाली होती. आतापर्यंत राज्यात दोन कोटी ८९ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, त्यातून एक कोटी ६८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी उतारा ९.२८ टक्के मिळाला. गाळप, साखर उत्पादन व उताऱ्यात कोल्हापूर विभाग पहिल्या क्रमांकावर, सोलापूर गाळप, उत्पादनात दुसऱ्या, उताऱ्यात पाचव्या व पुणे गाळप, उत्पादन, उताऱ्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे.कोल्हापूर विभागातील ३५ साखर कारखान्यांनी ७३ लाख ९३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून ७८ लाख २४ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी उतारा १०.५८ टक्के आहे. पुणे विभागातील २७ साखर कारखान्यांनी ६० लाख ८१ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून ५८ लाख ३५ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. सरासरी उतारा ९.६ टक्के आहे. सोलापूर विभागातील ४३ साखर कारखान्यांनी ६९ लाख ९६ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्यातून ५८ लाख ५७ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी उतारा ८.३७ टक्के आहे.अहमदनगर विभागातील २६ साखर कारखान्यांनी ३७ लाख २८ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून ३२ लाख ३३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी उतारा ८.६७ टक्के मिळाला आहे. औरंगाबाद विभागातील २१ साखर कारखान्यांनी १९ लाख ५१ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून १६ लाख ५५ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी उतारा ८.४८ टक्के मिळाला आहे. नांदेड विभागातील २६ साखर कारखान्यांनी २४ लाख ९ हजार मे.टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून २२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी उतारा ८.८४ टक्के आहे. अमरावती विभागातील २ तर नागपूर विभागातील ३ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. अडीच लाख टन उसाचे गाळप करून सव्वादोन लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

COMMENTS