Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा उद्या फैसला

जितेंद्र आव्हाड, अनिल पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचे राजीनामे

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीतील कार्यकर्ते आणि नेते भावूक झ

माजी मंत्री डॉ. दीपक सावंत कार अपघातात जखमी
बारामतीमध्ये दुचाकीवरून आलेल्या तिघांनी केला गोळीबार
राज्यात विरोधात, आणि ‘या’ ठिकाणी भाजप – महाविकास आघाडी आली एकत्र

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीतील कार्यकर्ते आणि नेते भावूक झाल्याचे पाहायला मिळत असून, बुधवारी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड, आमदार अनिल पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामा देत, शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदी कायम राहावे अशी गळ घालण्यात आली. यावर बोलतांना शरद पवारांनी स्पष्ट केले आहे की, 5 मे रोजी पक्षाची बैठक होणार असून, या बैठकीतील निर्णय आपल्याला मान्य असेल.

यासंदर्भात बुधवारी बोलतांना पवार म्हणाले की, राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्‍वासात घ्यायला हवं होतं असं ते म्हणाले आहेत. अध्यक्षपदासाठी जी समिती नेमण्यात आली आहे त्यांनी 5 मेला बैठक घ्यावी, त्या बैठकीत जो काही निर्णय घेण्यात येईल तो आपल्याला मान्य असेल असंही शरद पवार यावेळी म्हणाले आहेत. तर पुढे पवार म्हणाले की, ’मी पक्षातील वरीष्ठांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्‍वासात घ्यायला पाहिजे होतं असं मला आता वाटतं आहे. जर मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकपणे सर्वांनी मला विरोध केलाच असता. म्हणून मी हा निर्णय माझ्या मनाशी एकमत करून घेतला. पण आपण 6 मे रोजीची बैठक 5 मेलाच घ्या, समिती जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल असंही ते पुढे म्हणाले आहेत. राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे. या समितीची बैठक ही 6 मे रोजी होणार होती. पण आता शरद पवारांनी सांगितल्यानुसार ही बैठक 5 मे रोजी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार आपला निर्णय मागे घेणार का? किंवा राष्ट्रवादीला नवा अध्यक्ष मिळणार याचं उत्तर 5 मे ला मिळणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी नाट्यमय घडामोडीत अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केल्यानंतर आव्हाड यांनी हा निर्णय घेतला. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी आव्हाड यांनी केली.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मंगळवारी लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनावेळी पक्षाचे प्रमुखपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर शरद पवार यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांच्या समितीची बैठक झाली. त्यानंतर अजित पवार यांनी सांगितले की, शरद पवार यांना आपल्या निर्णयावर विचार करण्यासाठी दोन-तीन दिवसांची वेळ हवी आहे, त्यामुळे आता पवार काय निर्णय घेतात, याबाबत उत्सुकता आहे.

पवारांनी लोकभावनेचा आदर करावा ः आव्हाड – यासदंर्भात बोलतांना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ठाण्यामध्ये जिल्हा पातळीवर देखील अनेक पदाधिकारी राजीनामे देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शहरातील सर्वच पदाधिकारी यांनी राजीनामे आज दिले आहेत. पवार यांनी लोक भावनेचा आदर करावा, आणि आपला निर्णय मागे घ्यावा, देशाला त्यांची गरज आहे, तुम्ही भीष्म पितामह आहात त्यामुळे आपला राजीनामा मागे घ्यावा, आमची लढाई ही तुम्ही असल्यामुळे लढत आहेत, त्यांच्यावर विश्‍वास होता म्हणून आम्ही लढाई लढत राहत होतो. त्यामुळे निर्णय मागे घ्यावा असे आव्हाड यांनी सांगितले.

COMMENTS