Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्रापूरच्या युवकांची उत्तराखंड मध्ये फसवणूक

उत्तराखंड पोलिसांकडून युवकांना माणुसकीची मदत

शिक्रापूर- शिक्रापूर ता. शिरूर येथील दहा युवक केदारनाथ र्दशनासाठी उत्तराखंड येथे गेलेले असताना त्यांनी बुकिंग केलेल्या हॉटेल मधून त्यांची फ

नफा मिळवून देण्याच्या साडेतेरा लाखांची फसवणूक
सेवानिवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यास दीड कोटींचा गंडा
घराच्या शोधातील व्यक्तीची साडेचार लाखाची फसवणूक

शिक्रापूर- शिक्रापूर ता. शिरूर येथील दहा युवक केदारनाथ र्दशनासाठी उत्तराखंड येथे गेलेले असताना त्यांनी बुकिंग केलेल्या हॉटेल मधून त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवकांनी उत्तराखंड पोलिसांशी संपर्क साधला असता या युवकांना उत्तराखंड पोलिसांकडून तातडीने मदतीचा हात मिळून त्यांची फसवणूक झालेली रक्कम देखील परत मिळाली आहे.

                       शिक्रापूर ता. शिरूर येथील सुरज खेडकर, किशोर केवटे, मनोज गायकवाड, हर्षल चव्हाण, संकेत खेडकर, आकाश भुजबळ, सुनील दौंडकर, औंकार केवटे, प्रविण गाडे हे युवक केदारनाथ र्दशनासाठी उत्तराखंड येथे गेलेले होते मात्र दर्शनासाठी जात असताना त्यांनी तेथे राहण्यासाठी हॉटेलचे रुम बुकिंग केल्या होत्या परंतु बुकिंगसाठी युवकांनी हॅाटेल मालकाला बारा हजार रुपये पाठवलेले होते, तर सर्व युवक केदरनाथ मध्ये पोहचल्यानंतर सदर हॉटेल मालक युवकांचा फोन घेत नव्हता तसेच युवकांना दिलेल्या पत्त्यावर हॅाटेल देखील नव्हते त्यामुळे सर्व युवक हैराण झाले त्यांनतर दोन तास हॉटेल शोधल्यावर आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्याने या युवकांनी उत्तराखंड मधील जवळील गुप्तकाशी पोलीस चौकी मध्ये जाऊन घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला, त्यांनतर पोलिसांनी सदर हॉटेल मालकाचा नंबर युवकांकडून घेऊन बारा तासात हॉटेल मालकाचा शोध घेऊन  युवकांची फसवणूक झालेले पैसे देखील युवकांना परत केले यावेळी पोलिसांनी दाखवलेल्या सहकार्य बद्दल शिक्रापूरातील युवकांनी उत्तराखंड पोलिसांचे आभार मानले.

COMMENTS