बीड: उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार्या '

बीड: उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार्या ‘करिअर कट्टा’ उपक्रमाच्या बीड तालुका समन्वयकपदी सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर ऊर्फ काकू कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. श्रीमंत तोंडे यांची निवड करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास, उद्योजकता, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि करिअरविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी करिअर कट्टा उपक्रम महाराष्ट्रभर राबविला जात आहे. बीड तालुक्यातील महाविद्यालयांमध्ये या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे, विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देणे आणि शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आता प्रा. डॉ. श्रीमंत तोंडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य डॉ. संजय पाटील देवळाणकर, उपप्राचार्य डॉ. अनिता शिंदे, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. खान ए. एस. तसेच प्राध्यापकवृंद, मित्रपरिवार आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या निवडीमुळे बीड तालुक्यातील विद्यार्थ्यांना करिअर नियोजन, कौशल्य विकास आणि स्पर्धा परीक्षांसाठी अधिक प्रभावी मार्गदर्शन मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

COMMENTS