Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तक्रार निवारण्यासाठी हेल्पलाईन नंबर सुरू करावा

कोपरगाव नगरपालिकेकडे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांची मागणी

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव नगरपालिकेने जनतेच्या सुविधेसाठी आधुनिकतेचा अवलंब करत कायमस्वरूपी जनतेच्या सुविधेसाठी तक्रार निवारण व्हाट्सअप  नंबर व

हॉकर्सविरोधात आज कापड बाजारात उपोषण ; विविध संघटनांचा व्यापार्‍यांना पाठिंबा
पोलिसातील वाघ अखेर पोलिसांच्याच पिंजर्‍यात…; अत्याचाराच्या गुन्ह्यात निलंबित पोलिस निरीक्षक वाघला पोलिस कोठडी
पोलिस उपअधीक्षक पथकासमोरच दोघांची जुंपली

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव नगरपालिकेने जनतेच्या सुविधेसाठी आधुनिकतेचा अवलंब करत कायमस्वरूपी जनतेच्या सुविधेसाठी तक्रार निवारण व्हाट्सअप  नंबर व हेल्पलाइन संगणक प्रणाली सुरू करावी व ती आजच्या काळातील मोठी गरज असल्याचे मत माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे  प्रसिध्द करत नगरपालिकेला विनंती केली आहे.
यात पाटील यांनी म्हटलं आहे की,  मागील गेल्या दीड वर्षापासून नगरपालिकेचे मतदान लांबले असून मुख्याधिकारी हेच प्रशासक म्हणून काम पाहत आहे त्यामुळे पूर्वी प्रमाणे नागरिकांना आपापल्या वार्डातील पाणीपुरवठा , अस्वच्छ पाणी , आरोग्य  , रस्ते  , गटारी , डासांसाठी औषध फवारणी , कचरा , मोकाट जनावरां विषयी तक्रारी , रस्त्यातील अडथळे , रस्त्यांवरील खड्डे , बांधकाम विषयी परवानगी , बांधकामाचे अतिक्रमणे , विविध प्रकारचे दाखले जन्म , मृत्यू इ. शहर विकासाचे विविध कामे .इत्यादी कामे नगरपालिकेकडे असतात या कामाविषयी असलेल्या अडचणी नगरसेवकांकडे  तक्रार किंवा मागणी करता येत होती समस्या मोठी गंभीर असेल तर नगरसेवक तातडीने त्या विभागाच्या अधिकार्‍यांना  अथवा कर्मचार्‍यांना त्या वॉर्ड मध्ये असलेल्या समस्यांचे निरसन करत असे.
परंतु आता नगरपालिकेवर प्रशासक असल्याने प्रत्येक कामासाठी नागरिकांना नगरपालिकेत जावे लागते. कधी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांची अथवा कर्मचार्‍यांची भेट नाही झाली तर मोठ्या प्रमाणात गैरसोय होते त्यामुळे नागरिकांचे निष्कारण वेळ वाया जातो. मोठ्या प्रमाणावर नागरिक समस्या घेऊन आले तर अधिकार्‍यांचाही वेळ जातो त्यामुळे हा वेळ अधिकार्‍यांचा वाचला तर ते शहर विकासाच्या कामासाठी ते जास्त वेळ देऊ शकतील व गावाची प्रगती होऊ शकते. त्यामुळे या कामात सुसुत्रता यावी व कामे देखील विना अडथळा व्हावी यासाठी कोपरगाव नगरपालिकेने आता आधुनिकतेची कास धरत कायमस्वरूपी संगणीकृत हेल्पलाइन नंबर चालू करावा तसेच एक व्हाट्सअप नंबरही जाहीर करावा , जनतेला द्यावा जेणेकरून फोटोसह व नावासह त्या ठिकाणी तक्रार व्हाट्सअप वर पाठवता येईल. त्यामुळे नागरपालिकेने तत्काळ ही आधुनिक सुविधा कोपरगाव करासाठी सुरू करावी अशी विनंती कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

COMMENTS