देवीचं दर्शन घेऊन येणाऱ्या पाच जणांचा भयावह मृत्यू

Homeताज्या बातम्या

देवीचं दर्शन घेऊन येणाऱ्या पाच जणांचा भयावह मृत्यू

कार आणि बसचा भीषण अपघात अपघातात पाच जणांचा मृत्यू

लातूर प्रतिनिधी - उदगीर(Udgir) हून चाकूरला जाणारी एसटी महामंडळाची बस आणि तुळजापूर(Tuljapur) हून उदगीर कडे येणाऱ्या कारचा उदगीर-नळेगाव रस्त्यावरील हैब

समृद्धीवरील अपघातात दोन डॉक्टरासह 3 जणांचा मृत्यू
छत्तीसगडमध्ये नवरा-नवरीसह 5 जणांचा मृत्यू
कार आणि बाईकचा भीषण अपघात.

लातूर प्रतिनिधी – उदगीर(Udgir) हून चाकूरला जाणारी एसटी महामंडळाची बस आणि तुळजापूर(Tuljapur) हून उदगीर कडे येणाऱ्या कारचा उदगीर-नळेगाव रस्त्यावरील हैबतपूर पाटीच्या पुढे आज सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले असून, बसमधील जखमींना उदगीरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कारमधील मयत पाच जण उदगीर येथील एका खासगी रुग्णालयात कामाला होते.अलोक खेडकर, अमोल देवक्तते, कोमल कोदरे, यशोमती देशमुख, नागेश गुंडेवार असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नवे आहेत.

COMMENTS