विद्यार्थिनींना कौशल्यावर आधारित शिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल

विद्यार्थिनींना कौशल्यावर आधारित शिक्षण देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. ‘तुलसी क्रिएशन’च्या माध्यमातून होणारे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आणि इतर संस्थांसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार जालना महानगरपालिकेच्या महापौर वंदनाताई अरुण मगरे यांनी काढले.
देवगिरी प्रतिष्ठान संचलित ‘तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन’च्या नूतन वास्तूची तसेच ‘तुलसी क्रिएशन – द कम्प्लीट वुमन्स ड्रीम वर्ल्ड’ या शोरूमची पाहणी करण्यासाठी त्या बीड दौर्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत रमाई प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीनगरच्या अध्यक्षा चारुलता सुनील मगरे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी तुलसी महिला मंडळाच्या अध्यक्षा दीपा रोडे यांनी मान्यवरांचे स्वागत करून तुलसी शैक्षणिक समूहाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरणाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यानंतर मान्यवरांनी शोरूममधील विविध दालनांना भेट देत विद्यार्थिनींनी तयार केलेल्या आकर्षक पोशाखांची, डिझाईन्सची आणि कलाकृतींची बारकाईने पाहणी केली. तसेच फॅशन डिझाईन क्षेत्रासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या अत्याधुनिक सुविधा व प्रशिक्षण पद्धतीचेही त्यांनी विशेष कौतुक केले. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.अश्विनी बेद्रे, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS