Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई शहरातील पूर्व-पश्‍चिम दू्रतगती महामार्गावरील कामात अपहार

मुंबई प्रतिनिधी - मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीए विभागा अंतर्गत मुंबई शहरातील पूर्व आणि पश्‍चिम दू्रतगती महामार्गावर सन 2020-21

नगरच्या एमआयडीसी परिसरातही हनी ट्रॅप…
आई कुठे काय करते फेम गौरी कुलकर्णीने केला साखरपुडा ?
मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र गौरव पुस्काराने गुणगौरव सोहळा

मुंबई प्रतिनिधी – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीए विभागा अंतर्गत मुंबई शहरातील पूर्व आणि पश्‍चिम दू्रतगती महामार्गावर सन 2020-21 आणि 2021-22 मध्ये झालेल्या कामात नियमांची पायमल्ली करत, मोठा अपहार करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
यासंदर्भातील सविस्तर माहिती अशी की, मुंबई शहरातील पश्‍चिम दू्रतगती महामार्ग आणि पूर्व दू्रतगती महामार्गावर सन 2020-21 आणि 2021-22 मध्ये झालेल्या कामांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियम धाब्यावर शासकीय संस्थाकडून काही बाबींचे परीक्षण करण्याऐवजी खासगी संस्था असलेल्या पीएमसीकडून परीक्षण करून घेण्यात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा सध्या सार्वजनिक बांधकाम विभागात सुरु आहे. यासंदर्भातील कामकाजाचा कालावधी हा एप्रिल 2022 ते डिसेंबर 2022 पर्यंतचा म्हणजे आजदेखील या महामार्गाचे काम सुरु आहे. मात्र या संबंधित कामकाजावेळी शासनाच्या नियमांची पायमल्ली करत, पीएमसीची नेमणूक करून, शासनाच्या पैशांची उधळपट्टी करण्यामागे भूमिका काय, कोणते अर्थकारण यामागे आहे, याची चौकशी होण्याची गरज आहे.


महामार्गावरील कामाचा दर्जा सुमार – पश्‍चिम दू्रतगती महामार्गावर सध्यस्थितीत गटाराचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र सदर कामाचा दर्जा अंत्यत सुमार असून, या बांधकामासाठी कोणत्याही नियमांचे पालन करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. याचबरोबर सदरकामासाठी पीएमसीची नेमणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अशी यंत्रणा असतांना पीएमसीची नेमणूक कशासाठी, यातून मोठया आर्थिक गैरव्यवहाराचे गौडबंगाल दिसून येत आहे. त्याचबरोबर शासनाकडे अशी यंत्रणा असतांना पीएमसीची नेमणूक करून, याचा खर्च शासनाच्या माथी मारण्यात कोणता आर्थिक स्वारस्य आहे, याची चौकशी होण्याची गरज आहे. याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाची महामार्गाच्या देखभालीकरीता कार्यकारी अभियंता मार्ग निवास विभाग क्रमांक 4 यांच्याकडून पीएमसीची नेमणूक करण्यात आली आहे. संबंधित कार्यकारी अभियंता यांच्याकडे उप कार्यकारी अभियंता व शाखा अभियंता यांच्याकडे आहेत.


पीएमसीची नेमणूक करुन शासनाच्या पैशाची उधळपट्टी- मार्ग विकास कार्यकारी अभियंता विभाग 4 यांच्याकडे तांत्रिक कर्मचारी असतांना, त्यांच्यावर या कामाची जबाबदारी सोपवण्याऐवजी पीएमसीची नेमणूक करण्याचा घाट कशााठी घातला. गेल्या 5 वर्षांपासून दोन्ही महामार्गांच्या कामाच्या देखभाल दुरुस्तीकरिता मुख्य अभियंता एमएमआरडीए पीएमसीची नेमणूक केली आहे. पश्‍चिम व पूर्व दू्रतगतीची प्रगती पथावर असलेले कामे ही परीक्षण व दुरुस्तीचे आहेत. व त्याकरिता पीएमसीची आवश्यकता नाही. परंतु मुख्य अभियंता यांनी सदर कामाच्या देखभालीकरीता पीएमसीची नेमणूक केली आहे. त्यामुळे शासनाचा खर्च वायफळ होतांना दिसून येत आहे.

COMMENTS