Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केज शहरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी

केज प्रतिनिधी - केज शहरातील अहिल्याबाई होळकर नगर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी केली. या कार्यक्रमास

लाईव्ह मॅच दरम्यान कबड्डी खेळाडूचा मृत्यू.
तुमचे आजचे राशीचक्र बुधवार,१६ मार्च २०२२ l पहा LokNews24
निवृत्तीवेतनधारकांची माहिती आता एकात्मिक पेन्शनर्स पोर्टलसोबत जोडणार ः श्रीनिवास

केज प्रतिनिधी – केज शहरातील अहिल्याबाई होळकर नगर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी केली. या कार्यक्रमास जनविकास परिवर्तन आघाडीचे प्रमुख हारूनभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे, प्रा. हनुमंत सौदागर, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले, देशमुख साहेब यांची प्रमुख उपस्थित होती.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. जयंती उत्सव कमिटीच्या वतीने उपस्थित मान्यवराचे शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थितांना मार्गदर्शन करताना हारूनभाई इनामदार म्हणाले की, राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे विचार तरुणात व विद्यार्थ्यांमध्ये रुजले पाहिजे त्यांच्या कार्याचा आपण वसा पुढे घेऊन गेलो तर येणारी पिढीचे भविष्य नक्कीच उज्वल होईल. राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुढील जयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौक लगत मेन रोड येथे भव्य अशी शानदार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची कमान उभी करून त्यांच्या जयंतीच्या दिवशी केजच्या नगराध्यक्षा यांच्या हस्ते भव्य उद्घाटन करू असे हारुणभाई इनामदार यांनी समाज बांधवांना आश्वासन दिले आहे. प्रा. हनुमंत सौदागर यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकीत उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करून या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आहे. हनुमंत भोसले सर यांनी उपस्थित समाज बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी केज नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला उजळा देत पुढे बोलताना सीताताई बनसोड म्हणाले की, आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर व्याख्यान व प्रबोधन पर प्रवचनाचे विविध कार्यक्रम घेऊन समाजामध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास समाजाला शिकवला पाहिजे म्हणजेच तरुण पिढी त्यांचा इतिहास वाचून प्रेरित होईल आणि अहिल्याबाई होळकर यांचा इतिहास हा महिला भगिनींना समजेल असे नगराध्यक्ष सीता ताई बनसोड यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे. यावेळी नगरसेवक बाळासाहेब गाढवे, पत्रकार तात्या गवळी, अशोक रोडे,अमोल रोडे, पप्पू लांडगे, शैलेश भुतकर, बबलू रोड, पप्पू लांडगे, सिद्धार्थ गाढवे तात्या रोडे यांच्यासह महिला, नागरिक व जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी यांच्यासह युवक उपस्थित होते.

COMMENTS