Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बार्शी टाकळीत हभप अनिरूद्ध गोपाळकृष्ण क्षीरसागर महाराजांचे कीर्तन

गोविंदबुवा टाकळीकर यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त 24 व 25 एप्रिलला आयोजन

बार्शीटाकळी (अकोला) : इथल्या संतपरंपरेत गजानन महाराजांचे अवतारकार्य आणि त्याची महती अनन्यसाधारण आहे. गजानन महाराजांच्याच समकालीन श्री गजानन महाराजांच

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्याचा मृत्यू
भीमा नदी पात्रात बुडून चौघांचा मृत्यू
सीमाभागातील ऊस आंदोलन पेटले

बार्शीटाकळी (अकोला) : इथल्या संतपरंपरेत गजानन महाराजांचे अवतारकार्य आणि त्याची महती अनन्यसाधारण आहे. गजानन महाराजांच्याच समकालीन श्री गजानन महाराजांच्या अवताराचे मंगलाचरण गाणारे गोविंदबुवा टाकळीकर हे इथल्या संतपरंपरेत अज्ञात असलेले एक संत. ज्यांच्या समाधी सोहळयाचे हे 137 वे वर्ष आहे गोविंदमहाराज अकोला येथून 18 कि. मी. अंतरावर मंगुळनाथ मार्गावरील बार्शी टाकळी या गावाचे होते. हरीभक्त पारायण या उपाधिने त्याच्या मागील चार पिढया विभूषित होत्या, बार्शी टाकळी येथे जो प्राचिन मठ आहे. तो गोविदबुवांचा मठ त्यांच्या पूर्वजांनी बांधलेला आहे. गोविंदमहाराजांचा जन्म इ.स. 1800 च्या आसपासचा तर मृत्यू 1888 सालचा आहे. गोविंदप्रभू यांच्या कार्याची महती देणारा तत्कालीन ग्रंथही आज उपलब्ध आहे. तोच या महापुरूषाच्या कार्याची आजही साक्ष देतो. गोविंद महाराज हे एकनाथ महाराजांचा अवतार असल्याची मान्यता असून चैत्र वद्य प्रतिपदा व व्दितीय असे दोन दिवस हा पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो.
बार्शी टाकळी येथे होणार्‍या समाधि सोहळयात दर वर्षी हजारो भाविक सहभागी होत असतात. त्यानिमित्त या ठिकाणी मोठी यात्रा भरते. तसेच किर्तन प्रवचन आणि महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम आयोजित केला जातो. यावर्षी हा कार्यक्रम 24 व 25 एप्रिलला 2024 बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसात आयोजित केला जाणार असून याला भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ह.भ.प. श्री. अनिरूध्द गोपालकृष्ण क्षीरसागर महाराज आणि खोलेश्‍वर संस्थान विश्‍वस्त श्री. श्रीरामजी तुळशीराम येळवणकार (माजी पोलीस पाटील) अध्यक्ष, श्री. मदनलालजी रंगलालजी अग्रवाल उपाध्यक्ष, श्री. शेषरावजी नामदेवरावजी राजुरकर, श्री. चंद्रकांतजी मनोहररावजी वाटमारे श्री. आकाश मदनरावजी धात्रक, श्री. प्रशांत दिनकररावजी देशमुख, श्री. अशोक वामनरावजी म्हस्के, श्री. प्रफुलचंद्र नारायणरावजी माणीकराव व समस्त गावकरी मंडळी बार्शीटाकळी यांनी केले आहे.  खोलेश्‍वर मंदिराच्या आवारात गोंविद महाराजांची समाधी आहे. 24 एप्रिल 2024 रोजी याठिकाणी श्री. अनिरूध्द महाराजांचे किर्तन पूजन इत्यादी कार्यक्रम समाधि सोहळ्यानिमित्त होणार असून दही हंडी आणि प्रसादाचा कार्यक्रम सायंकाळी होणार आहे. दिनांक 25 एप्रिल 2024 ला सकाळी पालखीची मिरवणूक निघणार असून त्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले आहे.

COMMENTS