पीएमपीएमएल बसचे सीनजीएमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पीएमपीएमएल बसचे सीनजीएमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय

इंधनांच्या वाढत्या दरांचा फटका आता पुण्यातल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला  बसला आहे.

मनपात एकच चर्चा…32 खोके…एकदम ओक्के
पुण्यात पिस्टल, जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या
एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार नागरिकांचे लसीकरण

पुणे/प्रतिनिधीः इंधनांच्या वाढत्या दरांचा फटका आता पुण्यातल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला  बसला आहे. प्रदूषण आणि खर्च कमी करण्यासाठी ’पीएमपीएमएल’ ने आता डिझेल बसेसचे रुपांतर सीएनजी बसमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुणे महानगर परिवर्तन महामंडळाला आर्थिक फटका बसला आहे.  

    टाळेबंदीमध्ये बस बंद असल्याने आणि नंतर फक्त अत्यावश्यक सेवेसाठी सुरू ठेवल्याने ’पीएमीएमएल’चे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटले आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर आता ’पीएमीएमएल’च्या एकूण 233 बस या आता सीएनजी बसमध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहेत. सुरुवातीला यासाठी पाच बस प्रायोगिक तत्वावर रुपांतरीत करण्यात येणार आहेत. यानंतर इतर बस देखील बदलल्या जातील. याविषयी बोलताना ’पीएमीएमएल’चे अध्यक्ष व व्यवस्थपकीय संचालक राजेंद्र जगताप म्हणाले, की  सीएनजी बसमुळे प्रदूषण कमी होणार आहे. तसेच बसच्या इंजिनचे आयुष्यदेखील वाढेल. त्याचबरोबर  खर्च कमी होईल. तसेच यासाठीचा खर्च वर्षभराच्या आतच वसूल होईल.

COMMENTS