Homeताज्या बातम्या

चोपड्यात बापाचा मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; १२ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मुलगा गंभीर

चोपडा : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वडती गावात एका पित्याने आपल्या दोन अल्पवयीन मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

प्रीती पवार, जॅस्मिन लंबोरियानंतर सोमण राणाची सुवर्ण झेप; राष्ट्रकुल स्पर्धेत आठव्या सुवर्णपदकासह भारताची दमदार कामगिरी
कळसाचे दर्शन म्हणजेच विठ्ठलाचे दर्शन; ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांचे काल्याच्या कीर्तनात निरूपण
तंत्रशिक्षणात नवे पर्व; एआय आणि उद्योग अनुभवातून शिक्षक घडविण्याचा एमएसबीटीईचा संकल्प
Jalgaon Crime News | जळगाव: बापाचा झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला; मुलीचा  मृत्यू

चोपडा : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वडती गावात एका पित्याने आपल्या दोन अल्पवयीन मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात १२ वर्षांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर १० वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

खेळण्यासाठी आलेल्या एका लहान मुलाच्या सतर्कतेमुळे ही घटना उघडकीस आली. घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलांना पाहून गावकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संशयित आरोपी सुभाष भिल हा काही दिवसांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला होता. पोलिसांनी शेताच्या परिसरातून त्याला ताब्यात घेतले असून घटनेचा पुढील तपास अडनावद पोलीस व वरिष्ठ अधिकारी करत आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS