Homeताज्या बातम्यादेश

लग्नानंतर 6 दिवसातच नवरीने दिला बाळाला जन्म

मुरादाबाद- मुरादाबाद येथून एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. ज्यात लग्नाच्या 6 दिवसांनी नववधू आई झाली. नवरी आई झाल्याची बातमी परिसरात चर्चेचा

बोगसगिरीला चाप! व्यापार्‍यांचे धाबे दणाणले; ज्वारी-मका खरेदीत ’केराम पॅटर्न’चा दणका
मुस्लिमावर, दलित, अल्पसंख्यांक वर  होणार्‍या अन्याय अत्याचाराला शासन जबाबदार-अशोक हिंगे
मंत्रालयासमोरील नवीन प्रशासन इमारतीत ‘साप्रवि’ ची कार्यालये एकाच मजल्यावर आणणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुरादाबाद- मुरादाबाद येथून एक विचित्र प्रकरण समोर आलं आहे. ज्यात लग्नाच्या 6 दिवसांनी नववधू आई झाली. नवरी आई झाल्याची बातमी परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. लग्नाच्या 6 दिवसांनी वधू आई झाली आहे, हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. ही घटना मुरादाबादची आहे. हे संपूर्ण प्रकरण सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील आगवानपूर येथील आहे. वस्तीत राहणाऱ्या एका मुलीने लग्नानंतर सहा दिवसांनी बाळाला जन्म दिला. यानंतर पतीने तिला तिहेरी तलाक देऊन घराबाहेर हाकलून दिलं. तरुणी बाळाला घेऊन प्रियकराच्या घरी पोहोचली. प्रियकराने तिला ठेवण्यास नकार दिल्याने तिच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर प्रियकराने तिच्याशी लग्न करण्यास होकार दिला आहे. परंतु ही बाब नवरदेवाकडील परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. आगवानपूर येथील रहिवासी असलेल्या या तरुणीचा आठवडाभरापूर्वी मुघलपुरा परिसरात राहणाऱ्या तरुणाशी विवाह झाला होता. चौकशी केली असता असं आढळून आलं, की मुलीचे आई-वडील गरीब होते, त्यामुळे लग्नसमारंभासाठी मोजक्याच लोकांना बोलावण्यात आलं होतं. शनिवारी लग्नाच्या चौथ्या दिवसानंतर त्यांनी पुन्हा मुलीला वरासह निरोप दिला. रविवारी विवाहितेनं सासरच्या घरी मुलीला जन्म दिला. त्यानंतर पती आणि सासरच्यांनी मुलीच्या आई-वडिलांना फोन करून घरी बोलावलं. दोन्ही पक्षांमध्ये बराच वेळ वादावादी झाली. लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप पतीने केला आहे. यानंतर तरुणीची चौकशी केली असता तिने शेजारी राहणाऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचं सांगितलं. त्यानेच तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. यानंतर पतीने तरुणीला तिहेरी तलाक देऊन संबंध संपवले.

COMMENTS