Homeताज्या बातम्यादेश

  शाळेत 10 मिनिटे उशिरा पोहचल्याने विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण केली    

याप्रकरणी विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी शाळेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली

फरीदाबाद  प्रतिनिधी - शाळेत 10 मिनिटे उशिरा पोहचला म्हणून बारावीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण केल्यामुळे मुलाची प्रकृती गंभीर असल्या

मी 70 कोटीचे कर्ज वसुल करून दिले ; नवे अध्यक्ष अग्रवाल यांचा दावा, कृती आराखडा राबवण्याचा मनोदय
धान खरेदी केंद्राचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना : उपमुख्यमंत्री फडणवीस
“सिंधुताईंच्या जाण्याने असंख्य मुले पोरकी झाली” – राज्यपाल

फरीदाबाद  प्रतिनिधी – शाळेत 10 मिनिटे उशिरा पोहचला म्हणून बारावीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण केल्यामुळे मुलाची प्रकृती गंभीर असल्याची संतापजनक घटना फरीदाबाद घडली आहे. गंभीर अवस्थेत विद्यार्थ्याला दिल्लीतील होली फॅमिली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी शाळेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फरीदाबादमधील डीपीएस सेक्टर 11 स्कूलमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. अपूर्वा सिंह असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे . या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत आरोपी शिक्षक लोकेशला निलंबित करण्यात आले आहे.

COMMENTS